Court Order
Court Order 
महाराष्ट्र

तलाठ्यास लाच घेतल्याप्रकरणी वर्षाचा कारावास

संजय जाधव

बुलढाणा - घराची नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शेगावच्या एका तलाठ्याला खामगाव येथील विशेष सत्र न्यायालयाने Court Order एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि १५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या तलाठ्याविरुद्ध आणखी काही फसवणुकीची प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील तित्रंव येथील चिंतामण पुरुषोत्तम हिंगणे यांनी शेगाव भाग-२ मध्ये १६ मार्च २०१६ रोजी घर विकत घेतले होते. या घराची नोंद करण्यासाठी शेगाव भाग-२ चे तलाठी सुनील जगन्नाथ ठोंबरे रा. शेगांव यांच्याकडे घर नोंदणीसाठी २३ मे २०१६ रोजी अर्ज केला होता; परंतु तलाठी सुनील ठोंबरे यांनी घराची नोंद, फेरफार व ७/१२ ची नोंद करण्यासाठी चिंतामण हिंगणे यांना तीन हजाराची मागणी केली होती. त्यामुळे चिंतामण हिंगणे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे २३ मे रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला विभागाच्या पथकाने सापळा रचून तलाठी सुनील ठोंबरे याला शेगाव येथील त्यांच्या कार्यालयात चिंतामण हिंगणे यांच्याकडून तीन हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती.

तपासाअंती हे प्रकरण खामगांव येथील विशेष सत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश प्रज्ञा काळे यांच्या समोर झाली. याप्रकरणात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी चिंतामण हिंगणे, पंच सचिन देशमुख, तपास अधिकारी मंगेश मोहळ, तत्कालीन जिल्हाधिकारी व्ही. एन. झाडे या चौघांची साक्ष नोंदविण्यात आली. यांनतर संशयित आरोपी तलाठी सुनील ठोंबरे याने तीन हजाराची लाच घेतल्याचे सिध्द झाले. त्यामुळे सुनील ठोंबरे याला कलम ७ मध्ये एक वर्ष शिक्षा व ५ हजार दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा कलम १३ मध्ये एक वर्षाची शिक्षा व १० हजार दंड, दंड न भरल्यास २ महिन्याची शिक्षा ठोठावली आहे.

या दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या आहेत.

लाचखोर तलाठी सुनील ठोंबरे याचे विरुद्ध अकोला येथील जिजाऊ कमर्शिअल को-ऑप. बँक शाखा अकोला या संस्थेलाही एका कर्जदारासोबत संगनमत करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असून सदर प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

Narendra Modi Exclusive : अभिजित पवार यांनी PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; देशभरासह महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

SCROLL FOR NEXT