Court, Sangli, Crime News, Mother
Court, Sangli, Crime News, Mother Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News : मुलीच्या खून प्रकरणात न्यायालयाने सुनावली जन्मदात्या आईला जन्मठेप

विजय पाटील

सांगली : मुलगी झाल्याने नाराज होऊन अवघ्या तिसऱ्या दिवशी त्या अर्भकाच्या दुप्पट्याने गळा आवळून खून केल्याप्रकरणी सुमित्रा गंगाप्पा जुट्टी या तीस वर्षीय महिलेस म्हणजेच जन्मदात्या आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली (sangli) जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. (Sangli Crime News)

सुमित्रा जुट्टी हिच्या पहिल्याच मुलाचा तीन दिवसाच्या आत मृत्यू झाला होता. जुट्टी कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल झाल्या होत्या. तिला मुलगी झाल्याचे समजल्यापासून ती नाराज होती. मुलगी झाली म्हणून तिने (18 ऑक्टोंबर 2020) रात्रीच्या सुमारास अर्भकाचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. डॉक्टर मधुकर जाधव यांनी याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सहायक पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले होते. रोशनी कौशल शिंदे या प्रत्यदर्शी साक्षीदार होत्या. त्यांनी जुट्टींना अर्भकाचा गळा आवळत असताना पाहिले होते. ही बाब त्यांनी परिचारिकाला सांगितली. त्यांनी लगेच अर्भकास लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. डॉक्टर यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारादरम्यान अर्भकाचा मृत्यू झाला होता.

सर्व पुरावे पाहून आणि साक्षीदाराचे जबाब पाहून न्यायालयाने जुट्टींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आईने अर्भकाचा खून केल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली होती. अखेर या खटल्याचा निकाल देत आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology: रस्त्यात सापडलेले पैसे उचलणं शुभ की अशुभ?

Today's Gold Silver Rate : सोन्याचे दर पुन्हा कडाडले, चांदीही महागली; मुंबई-पुण्यातील आजचा भाव काय?

Chandrahar Patil: वसंतदादांचे नातू भाजपची बी टीम; पाकीट घेऊन 'मविआ'समोर उभे.. चंद्रहार पाटलांचा विशाल पाटलांवर प्रहार!

Today's Marathi News Live : श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीसाठी हजारो कार्यकर्ते डोंबिवलीत दाखल

Police Constable Death: चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

SCROLL FOR NEXT