court granted bail to ravikant tupkar  saam tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar : जामीन मिळताच रविकांत तुपकर म्हणाले, 'त्यांना धडा शिकविणार...'

संजय जाधव

Buldhana News :

शेतकरी नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar latest marathi news) यांच्या आंदोलनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई करुन त्यांचा जामीन रद्द करावा यासाठी बुलढाणा पाेलिस दलाने (buldhana police) दाखल केलेल्या अर्जावर आज बुलढाणा न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने रविकांत तुपकर यांना सशर्त जामीन मंजूर (bail granted to ravikant tupkar) केला आहे. दरम्यान उद्यापासून (गुरुवार) खामगाव तालुक्यातून निर्धार परिवर्तन रथ यात्रेस प्रारंभ करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

आज रविकांत तुपकर हे स्वतः बुलढाणा न्यायाल्यात हजर झाले. तुपकर यांच्या पत्नी शर्वरी यांनी न्यायाल्यात युक्तिवाद सादर केला. जिल्हा व सत्र न्यायालयाने रविकांत तुपकरांना सशर्त जामीन केल्यानंतर शेतक-यांनी बुलढाणा शहरात फटाके फाेडले. रविकांत तुपकरांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्यासमवेत शेतक-यांची विश्रामगृहात बैठक झाली.

त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही

दरम्यान माध्यमांशी बाेलताना रविकांत तुपकर म्हणाले आता लोकसभेच्या निवडणुकीत नव्या दमाने उतरणार असून ज्यांनी मला तुरुंगात टाकण्याचा कट रचला होता त्यांना आता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा तुपकरांनी विरोधकांना दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्यापासून निर्धार परिवर्तन रथ यात्रा

तुपकर म्हणाले उद्यापासून निर्धार परिवर्तन रथ यात्रा सुरुवात हाेईल. खामगाव तालुक्यातील मांडका येथून त्याची सुरुवात हाेणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यात्रा जाईल. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही निर्धार यात्रा आहे. मागासलेला जिल्ह्याची ओळख आम्हांला पुसायची आहे असेही तुपकरांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी परिवर्तन करायचा आहे. किती शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्यावर सरकार निर्णय घेणार आहे. शेतकरी फासावर जाण्याच्या अगोदर सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी तुपकर यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

SCROLL FOR NEXT