वाढदिवस प्रेमी युगलाच्या अंगलट! जमावाची जोडप्याला बेदम मारहाण Saam Tv
महाराष्ट्र

वाढदिवस प्रेमी युगलाच्या अंगलट! जमावाची जोडप्याला बेदम मारहाण

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला - एका जोडप्याला वाढदिवस साजरा करणे चांगलेच अंगलट आले आहे. या प्रेमी युगुलाला जमावाने बेदम मारहाण केल्याचा धक्कदायक प्रकार अकोल्यात घडला आहे. अकोल्यातील उरल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गायगा पेट्रोल पंपाजवळ एक प्रेमी युगुल वाढदिवस साजरा करत होते. यावेळी या प्रेमी युगुलाला जमावाने अडवले आणि मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी जमावातील एकाने मोबाइलमध्ये हा संपूर्ण प्रकार शूट करत त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

जमाव तरुणीसमोर या तरुणाला मारहाण करत होते. तरुणीने हात जोडून या जमावाला मारहाण न करण्याची विननणी केली. पण, त्या जमावाने मारहाण सुरुच ठेवली. मारहाणी दरम्यान मुलगी मुस्लीम नसल्याचे लक्षात आल्यानंतर जमावाने मारहाण करणे थांबवले आणि त्यानंतर मुलीला सर्वांसमोर बुरखा काढायला भाग पाडले. याप्रकरणी प्रेमी युगुलाकडून तक्रार दाखल केलेली नाही. मात्र पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे दोन आरोपींना अटक केली आहे.

गायगा पेट्रोल पंपाजवळ या प्रेमीयुगुलाला जमावाच्या टोळक्याने अडवले. यावेळी ओळख लपवण्यासाठी या तरुणीने बुरखा परिधान केला. बुरखा परिधान करून ती मुलासोबत जात असल्याचे पाहून काही मुस्लीम तरुणांच्या टोळक्याने त्यांना अडवले आणि त्यानंतर मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: ४ राशींच्या व्यक्तींना गुंतवणूक ठरेल लाभदायक, पैशाची तंगी होईल दूर, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Gajkesari Rajyog: डिसेंबर महिन्यात बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींना अचानक मिळणार बक्कळ पैसा

BSNL चा धमाका! अनलिमिटेड कॉलिंग अन् १०० जीबी डेटा; विद्यार्थांसाठी आणला नवा प्लॅन

Shocking : क्षणात सर्व काही संपलं! सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू

Income Tax Refund: करदात्यांसाठी बातमी, कर परतावा कधी मिळणार, आली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT