Nagpur Police Saam TV
महाराष्ट्र

मोबाईलवर बोलायला 100, गांजाच्या पुडीला 1000 रुपये; कारागृहे बनली भ्रष्टाचाराचा अड्डा

राज्यातील कारागृह भ्रष्टाचाराचे अड्डे झाले असून या कारागृहांमध्ये कैद्यांना मोबाईल आणि अंमली पदार्थ पोहचत असल्याची धक्कादायक माहिती पुढं आली आहे.

संजय डाफ

नागपूर: राज्यातील कारागृह भ्रष्टाचाराचे अड्डे झाले असून या कारागृहांमध्ये कैद्यांना मोबाईल आणि अंमली पदार्थ पोहचत असल्याची धक्कादायक माहिती पुढं आली आहे. कैद्यांकडून पैसे घेऊन त्यांना मोबाईलसह इतर सुखसुविधा पुरविल्या जात आहेत. मोबाईल वर बोलण्यासाठी कैद्याकडून १०० रुपये प्रतिमिनिट रक्कम वसूल केली जात असून. यात एक रॅकेट सक्रिय आहे. कारागृहांमध्ये मोबाईल, अंमली पदार्थ सापडणे नवीन नाहीत. २०१८ मध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या बराकीची झडती घेतली असता तेथे भ्रमणध्वनी संच, गांजा, चिलीम, अंमली पदार्थासह दारू आणि शस्त्रसुद्धा सापडली होती.

राज्यातील कारागृहात कैद्यांना सुविधा पुरवण्याचे वेगवेगळे दर ठरलेले आहेत. काही कारागृहात कैद्याकडून प्रतिमिनिट १०० रुपये दर मोबाईलवर बोलण्याचा आकारला जाते. तर गांजाची पुडी १००० रुपये आणि जेवणाला तडका मारण्यासाठी १०० रुपये घेण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. कैद्यांकडे येणाऱ्या या सुखचैनीच्या वस्तू कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय येणे शक्य नसल्याने येथे एक रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक, कोल्हापूर-कळंबा, नागपूर, येरवडा, मुंबई, औरंगाबाद या कारागृहात आतापर्यंत कैद्यांना गांजा, ड्रग्ससह मोबाईल पुरवण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी गुन्हेसुद्धा दाखल झाले असून काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील कळंबा कारागृहातून पाऊण किलो गांजा, १० मोबाईल, २ पेनड्राईव्ह, ५ चार्जिग कॉड जप्त करण्यात आले होते.

नागपुरातील कारागृह लिपिक विक्रम गिर याच्या बॅगेत गांजा सापडला होता. तो कैद्यांना १००० रुपये प्रमाणे विकत होता. कोल्हापूरमधील कारागृह कर्मचारी किसन याच्या मोज्यातून कैद्यांपर्यंत चिठ्ठी पोहचवण्याचे काम करीत होता. महिनाभर निरोप पोहचवण्यासाठी २५ हजार रुपये किसनला मिळत होते. त्यामुळं कारागृहात एक मोठे रॅकेट सक्रिय असून त्यात कारागृह प्रशासयाचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

Nandurbar Crime : किरकोळ वादातून भररस्त्यात चाकू हल्ला; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

Maharashtra Live News Update: एमएससीबीच्या वायरमेनच काम करणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT