Sangli Crime विजय पाटील
महाराष्ट्र

लाचखोर शिक्षणाधिकारी आणि अधीक्षक निलंबित

शिक्षणाधिकारी आणि अधीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली: शिक्षकांना वेतनश्रेणी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणीकरणाऱ्या शिक्षणाधिकारी (Education Officer) आणि अधीक्षकावर (superintendent) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सांगली (Sangli) जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. विभागीय शिक्षण आयुक्तांनी (commissioner) ही कारवाई केली आहे. काही दिवसाअगोदर या दोघांना ३ शिक्षकांकडून १ लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले हते. त्यांच्याविषयी झालेल्या कारवाईचा अहवाल आल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील पाहा-

३ शिक्षकांनी वेतनश्रेणी मिळविण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कांबळे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कांबळे आणि सोनवणे यांनी प्रत्येकी ६० हजार रुपयांप्रमाणे १ लाख ७० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसे दिले तर प्रस्ताव मंजूर केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले होते. यामुळे शिक्षकांनी २६ एप्रिल दिवशी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करण्यात आली होती.

या विभागाच्या पथकाने तेव्हापासून ते २ मेपर्यंत चौकशी करण्यात आली. यावेळी कांबळे आणि सोनवणे यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. १ लाख ७० हजार रुपये लाच घेताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या घरावर छापे टाकून झडती घेण्यात आली. यामध्ये कांबळेच्या घरातून १० लाख रुपयांची रोकड आणि महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. तर सोनवणेच्या घरात ३ लाखांची रोकड सापडली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

३ शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या विषयी प्रत्येकी ६० हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. विष्णू कांबळे आणि विजयकुमार सोनवणे अशी लाच स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. १ लाख ७० हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री दोघांना लाचेच्या रकमेबरोबर पकडले आहे. दोघांवर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

SCROLL FOR NEXT