मनपाच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसेचे उग्र आंदोलन अरुण जोशी
महाराष्ट्र

मनपाच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसेचे उग्र आंदोलन

मनपा प्रशासनातील अस्वच्छता आणि भोंगळ कारभाराबाबत मनसे आक्रमक झाली आहे.

अरुण जोशी

अमरावती : मनपा Corporation प्रशासनातील अस्वच्छता आणि भोंगळ कारभाराबाबत मनसे MNS आक्रमक झाली आहे. महानगर अध्यक्ष संतोष बद्रे यांच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिकेत उग्र आंदोलन करण्यात आले आहे. मनपा आयुक्तांच्या Commissioner दालना लगतच्या जाळीची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच मनपा प्रशासना विरोधात प्रचंड घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे मनपा परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

हे देखील पहा-

अनेक दिवसांपासून अमरावती Amravati महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यूच्या dengue रुग्णांचा आकडा वाढत आहे. पावसाळ्याचे Rain दिवस सुरु आहेत. महापालिका प्रशासनाचे स्वच्छता, साफसफाई कामगार अशा गंभीर विषयाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. शहरात अनेक रोगराईच्या समस्या वाढत आहे. त्याचप्रमाणे शहरामधील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे.

नवीन रस्ते तयार करणे, तर दूरच परंतु पावसाळ्याचे दिवस बघता मुरूम टाकण्याची तसदी सुद्धा मनपा घेत नाही. या सर्व समस्यांवर मनसेने वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत. परंतु, कुठलेही सकारात्मक पाऊल मनपाच्या वतीने उचलण्यात येत नाहीत. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज चांगलीच आक्रमक झाली होती. मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. तसेच प्रवेशद्वाराला लाथाबुक्क्यांनी तोडफोड यावेळी करण्यात आलेली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar : फडणवीस हे शिंदेंऐवजी सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करतील; राऊतांच्या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करणार : मुख्यमंत्री

Chhatrapati shivaji maharaj history: प्रतापगडावर मृत्यूपूर्वी अफजलखानाचे शेवटचे शब्द काय होते?

Invisible Mangalsutra Designs: एकदम नाजूक! 'इन्व्हिजिबल मंगळसूत्र' चा नवीन पॅटर्न, सौंदर्य दहापटीने खुलून येईल

Gold Rate Today : मोठी बातमी! चांदी ४ हजारांनी स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण, वाचा सुवर्णनगरीतील दागिन्याची किंमत?

SCROLL FOR NEXT