राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. संपूर्ण राज्यभरात कोरोनाची रुग्णांची संख्या ८३२ झालीय. यात नव्या जेएन-१ व्हेरियंटचे ३२ रुग्ण आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, आणि पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. (Latest News)
आज आरोग्य विभागाकडून (Department of Health) आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या एक्स बीबी.१.१६ कोरोना (Corona) व्हेरियंटचे १९७२ रुग्ण आहेत. त्यापैकी १९ रुग्णांचा मृत्यू झालाय. तर कोरोनाच्या नव्या जेएन- १ व्हेरियंटचे ३२ रुग्ण आढळून आले आहेत. तर १जानेवारी २०२३ पासून १३७ कोरोना रुग्णांचा (patients) मृत्यू झालाय. यात ७.८० टक्के रुग्णांनी साठी ओलांडली होती. तर ८४ टक्के सहबाधित आणि १६ टक्के रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती.
कोरोना जेएन-१ चे रुग्ण संख्या
राज्यातील ९ जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या जेएन-१ व्हेरियंटचे रुग्ण आढळली आहेत. या नव्या व्हेरियंटचे पुण्यात सर्वाधिक १७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर ठाण्यात ५ जेएनचे रुग्ण आहे. बीड-३, छ.संभाजीनगर-२,कोल्हापूर-१,अकोला-१, सिंधुदुर्ग-१, नाशिक-१, सातारा-१, रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागानुसार, आज नवीन १३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ८०,२३,७२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यानुसार राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के झाले आहे. १ जानेवारी २०२३ पासून कोरोनामुळे १३७ रुग्णांचा मृत्यू झाला असेल तरी राज्यातील कोरोनाचा मृत्यू दर १.८१ टक्के आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.