कोरोना नंतर भंडाऱ्यात आता डेंग्यूचा कहर! File Photo
महाराष्ट्र

कोरोना नंतर भंडाऱ्यात आता डेंग्यूचा कहर!

भंडारा जिल्ह्यात सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांचा फैलाव वाढला असून डेंग्यूच्या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भंडाऱ्यात आज एका डेंग्यू रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

अभिजित घोरमारे

भंडारा : भंडारा जिल्ह्यात सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांचा फैलाव वाढला असून डेंग्यूच्या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भंडाऱ्यात आज एका डेंग्यू रुग्णाचा मृत्यू झाला आहे. स्वप्नील चटप (वय 23) असे डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा -

स्वप्नील चटप याला चार दिवसापूर्वी ताप व डोकेदुखीसारखी लक्षणे जाणवू लागली. भंडारा शहरातील एका खाजगी डॉक्टरांकडे दाखविले असता त्यांनी व्हायरल इन्फेक्शन असल्याचे सांगितले, मात्र 3 दिवसानंतरही ताप कमी न झाल्याने त्याला दुसऱ्या डॉक्टरकडे नेण्यात आले.

तेथे रक्त व इतर चाचण्या केल्यानंतर स्वप्नीलला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी त्याला ताबडतोब नागपूरला हलविण्यास सांगितले. मात्र नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्वप्नील हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 254 डेंग्यू संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 13 जणांना डेंग्यूची लागण झालेली असल्याचे निदर्शनास आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora: फिटनेस क्विन मलाइका अरोराचं वय नक्की किती?

Puran Poli Ice Cream Recipe : सणासुदीला आवर्जून घरी ट्राय करा पुरणपोळी आईस्क्रीम, फॉलो करा सिंपल रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवल्याने काय होते? फायदे की तोटे

Kajal Smudge Tips: काजळ लावल्यावर लगेच पसरतं? मग या ५ टिप्स वापराच, डोळे दिसतील सुंदर अन् टपोरे

Stomach Cancer Symptoms: पोटात खूपच दुखतय? करू नका दुर्लक्ष, असू शकतं कॅन्सरचं हे लक्षण

SCROLL FOR NEXT