लॉकडाऊनचे नियम शिथिल; मात्र हॉटेल व्यावसायिकांवर अन्याय?

ठाण्यामध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर, रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, हॉटेल्स तसेच रेस्टोरंटला मात्र ४ वाजेपर्यंतच परवानगी आहे.
unlock
unlockलॉकडाऊनचे नियम शिथिल; मात्र हॉटेल व्यावसायिकांवर अन्याय?

ठाणे : ठाण्यामध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असल्याने व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असला तरी, हॉटेल्स तसेच रेस्टोरंटला मात्र ४ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली असल्याने आता हॉटेल्स व्यावसायिकांनी मोठा निर्णय घेतला आहे. इतर आस्थापनांना १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे, मात्र हॉटेल्स व्यावसायिकांवरच अन्याय केला जात असून रविवार पर्यंत सरकारने हॉटेल्स संदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास सोमवार पासून सर्व हॉटेल्स बंद ठेवण्याबरोबरच पार्सल सुविधा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील पहा -

ठाणे हॉटेल्स असोशिएशनच्या वतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला असून पार्सल सुविधाही बंद झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचे मात्र चांगलेच हाल होणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांबरोबरच ग्रामीण भागातील दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

unlock
भाजपकडून एमआयएमचा सत्कार !

यापूर्वी केवळ ४ वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे छोट्या आणि मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने अनेकवेळा व्यापाऱ्यांनी आंदोलने केली होती. दुकाने १० वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी, मॉल्स आणि चित्रपट गृहांचे शटर मात्र तूर्तास बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे हॉटेल्स, बार आणि रेस्टोरेंट यांना मात्र या नव्या नियमावलीमधून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. हॉटेल्स व्यवसायिकांना पूर्वीप्रमाणेच ४ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली असल्याने आता हॉटेल्स व्यावसायिक देखील संतापले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com