corona virus Latest Updates, Rajesh Tope News, Maharashtra Corona updates Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात पुन्हा मास्क अत्यावश्यक, पण...; आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

राज्यात कोरोनानं पुन्हा डोके वर काढले आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची (corona Patients) संख्या वेगाने वाढत आहे. राज्य सरकारकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. राज्यात पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क (Mask) सक्ती करण्यात आली आहे. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालये, कॉलेज, शाळा आदी ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

राज्यात मास्कसक्ती करण्यात आली नाही. मात्र, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे आहे. तशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. हे एक प्रकारचे आवाहन आहे, असंही टोपे म्हणाले. मोकळ्या जागी शिथिलता असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Corona Latest News In Maharastra)

राज्यात कोरोनानं पुन्हा डोके वर काढले आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या ही हजारांच्या वर आढळून आली आहे. त्यामुळं राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सतर्क झालं आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तात्काळ टास्क फोर्सची बैठक बोलावली होती.

त्यानंतर आता नवीन माहिती समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य विभागाने पत्रकात म्हटले आहे. रेल्वे, बस प्रवास, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालये, शाळा-कॉलेज आदी ठिकाणी मास्क वापरणे अत्यावश्यक असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

राजेश टोपे काय म्हणाले?

राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती केल्याचे वृत्त सुरुवातीला आले होते. आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात मास्क वापरणे 'मस्ट' असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे गोंधळ उडाला. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काही जिल्ह्यांत कोरोना रुग्ण वाढत आहेत. मुंबई, पुणे, पालघर आदी भागांत रुग्ण वाढत आहेत. त्यात केंद्राकडून एक पत्र आलं आहे.

टास्क फोर्सने मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. कुठेही सक्ती नाही. खुल्या ठिकाणी शिथिलता आहे. मास्क सक्ती नाही. मास्क वापरणे अत्यावश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले. चाचण्या वाढवाव्यात, लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असंही आवाहन त्यांनी राज्यातील नागरिकांना केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT