आषाढीनिमित्त बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण
आषाढीनिमित्त बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण भारत नागणे
महाराष्ट्र

आषाढीनिमित्त बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण

Krushnarav Sathe

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी व अधिकारी पंढरपुरात दाखल झाले आहेत. या पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आज दिवसभरात सुमारे सोळाशे पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. Corona infection to police came for security on occasion of Ashadi

हे देखील पहा -

या कर्मचाऱ्यांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती सोलापूर विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी यात्रा सोहळा प्रतीकात्मक पद्धतीने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात येणार आहे. 18 ते 25 जुलै दरम्यान पंढरपूर परिसर व आसपासच्या ९ गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. प्रमुख मार्गावर त्रिस्तरीय नाका-बंदी देखील करण्यात आली आहे.

बंदोबस्त दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांचे कोरोना पासून संरक्षण व्हावे यासाठी पोलीस विभागाने प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, साबण आधी साहित्याचे किट दिले आहे.

आषाढी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची आज सायंकाळी संत तनपुरे महाराज मठामध्ये कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना बंदोबस्ताच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्.. मुंबईतील संतापजनक घटना

IPL 2024 Playoffs: CSK चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी करावं लागेल हे काम

Anuj Thapar News : "अनुज थापरची आत्महत्या नाही तर हत्या...", कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Sidhu Moosewala: सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात मोठी अपडेट, गोल्डी ब्रारसह 25 जणांवर आरोप निश्चित

Today's Marathi News Live : अमित शहा बनावट व्हिडीओ व्हायरल प्रकरण : कोर्टाने कारवाईची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT