इगतपुरीतील मुंढेगावच्या आश्रमशाळेत 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
इगतपुरीतील मुंढेगावच्या आश्रमशाळेत 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण Saam Tv
महाराष्ट्र

इगतपुरीतील मुंढेगावच्या आश्रमशाळेत 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुढेगाव येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना (students) गुरुवारी उपचाराकरिता तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयात (hospital) जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी करून डॉक्टरांना योग्य त्या सूचना करण्यात आहेत. (Corona infection 15 students at Mundhegaon Ashram School in Igatpuri)

हे देखील पहा-

इगतपुरी तालुक्यात मुंदेगाव येथे आदिवासी (Tribal) विकास विभागाची आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत 300 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यांला चार- पाच दिवसांपूर्वी कोरोनाचे सदृष्य लक्षणे आढळून आल्याने त्याची अॅन्टीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्याची अॅन्टीजेन पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आश्रम शाळेत एकच खळबळ उडाली आहे.

परंतु, संबंधित विद्यार्थ्याच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, विद्यार्थ्यांच्या अॅन्टीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हा विद्यार्थी इतर विद्यार्थ्याच्या संपर्कात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून आदिवासी विभागाकडून शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि मध्यवर्ती स्वयंपाक गृहातील सुमारे 374 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

या चाचणीचा अहवाल गुरुवारी विभागास प्राप्त झाल्यानंतर यातील 14 विद्यार्थ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आदिवासी विकास विभागाची चांगलीच धावपळ उडाली आहे. बाधित सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचाचणीची माहिती कळताच जिल्हाधिकारी सरनमा यांनी तात्काळ जिल्हात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस करत डॉक्टरांना विद्यार्थ्यांची काळजी घेण्याच्या सूचना दिले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT