Nagpur Corona Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Corona: नागपूरात कोरोनाचा धोका वाढला, 7 गर्भवती आणि 6 बाळंतिणींना कोरोनाची लागण!

Corona Latest Update: नागपूरमध्ये झपाट्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नागपूरात गेल्या 11 दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा 536 वर पोहचला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagpur News: देशामध्ये कोरोनाने (Corona Virus) पुन्हा डोकेदुखी वाढवली आहे. कोरोनाने पुन्हा एखदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालल्यामुळे सरकारच्या (Central Government) चिंतेत वाढ झाली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. अशामध्ये नागपूरमधून कोरोनाबाबत (Nagpur Corona) धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरमध्ये ७ गर्भवती आणि ६ बाळंतिणींना कोरोनाची लागण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये झपाट्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नागपूरात गेल्या 11 दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा 536 वर पोहचला आहे. अशामध्ये नागपूरमध्ये 7 गर्भवती तर 6 बाळांतिणींना कोरोनाची लागण झाली आहे.

यामध्ये मेयोमधील ६ गर्भवती आणि ३ बाळंतीण महिलांचा समावेश आहे. यामधील २ बाळंतीण महिलांवर उपचार सुरु आहेत. तर मेडिकलमध्ये १ गर्भवती आणि ३ बाळंतीण महिलांना कोरोना झाला आहे. यामधील दोन बाळंतीण महिलांवर उपचार सुरु आहेत. सर्व महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

गर्भवती आणि बाळंतीण महिलांना कोरोनाचा धोका जास्त असतो. त्यामुळे या महिलांनी योग्य ती खबरदारी घेत मास्कचा वापर करावा असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्याचसोबत जर या गरोदर महिला अथवा बाळंतीण महिलांना कोरोनाची लागण झाली तर त्यांच्या बाळांना देखील त्याची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी आधीच कोरोनापासून बचाव करण्यासाठी योग्य काळजी घ्यावी. तसंच, या महिलांनी शारीरिक अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, हात व चेहऱ्याची स्वच्छता ठेवावी यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता येईल.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 7,830 कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांचा हा आकडा 223 दिवसांतील सर्वाधिक आहे. तर गेल्या 24 तासांत संसर्गामुळे 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजारांच्या वर गेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकरांना मारहाण

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT