Kalyan Crime News : डान्सबारच्या गेला आहारी, पत्रकार करू लागला घरोघरी चोरी

उच्चशिक्षित सराईत चोरट्याला कल्याण खडकपाडा पोलिसांनी केली अटक
Kalyan News
Kalyan NewsSaam Tv

अभिजीत देशमुख

Crime In Kalyan : मास मीडिया पर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर एका प्रसिद्ध वृत्तपत्रात नोकरीला लागला. मात्र याच दरम्यान त्याला डान्स बारचे व्यसन लागले आणि झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी तो चोरीच्या मार्गाकडे वळला. हा तरुण भरदिवसा बंद घरे हेरून घरोफोड्या करायचा. एकटाच असल्याने पोलिसांची देखील त्याचा शोध घेता घेता महिना भर दमछाक झाली अखेर खडकपाडा पोलिसांनी सीसीटिव्ही व तांत्रिक तपास करत या चोरट्याला बेड्या ठोकल्या. (Latest Marathi News)

Kalyan News
Radhakrishna Vikhe-Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारखान्याच्या चौकशीचे आदेश; नेमकं कारण काय?

या चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल ४७ तोळे सोन्याचे दागिने ,मोबाईल, लॅपटॉप,महागडी घड्याळ, हस्तगत केले आहेत चोरलेला ऐवज, पैसे रोशन डान्स बारमध्ये उधळायचा.कल्याण मध्ये भरदिवसा घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्यातच मोहणे परिसरात एका चोरट्याने घरफोडी करत तब्बल ३५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. मात्र ज्या इमारतीमध्ये चोऱ्या झाल्या त्या ठिकाणी सीसीटिव्ही (CCTV) नसल्याने पोलिसांसमोर (Police) या चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले होते.

खडकपाडा पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी परिसरातील सीसीटिव्ही तपासले. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक फुटेजच्या आधारे अखेर या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांना आरोपीकडून मोहने,आंबिवली,टिटवाळा ,शहापूर या भागातील आठ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. (Kalyan News)

Kalyan News
Karnataka assembly elections 2023: विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात दूधावरून राजकीय संघर्ष, अमूल की नंदिनी; नेमका काय आहे वाद?

पोलिसांनी आरोपीकडून ४७ तोळे सोन्याचे दागिने ,लॅपटॉप,मोबाईल,महागडी घड्याळं असा मुद्देमाल हस्तगत केला आहे .दरम्यान आरोपी हा उच्च शिक्षित असून त्याने मास मीडिया पर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं.

त्यानंतर काही तीन वर्ष एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात काम केलं. याच दरम्यान त्याला डान्स बारचा नाद लागला. त्यासाठी त्याला पैशांची कमतरता भासू लागल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडला. गेल्या काही वर्षापासून तो घरफोड्या करत होता अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com