Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीकडून मविआची कॉपी? महायुतीचाही सीएमपदाचा फैसला निकालानंतरच; वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Assembly Election 2024: महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु आहे.त्यावर अमित शाहांनी दिल्लीत तोडगा काढलाय.. हा शाहांचा तोडगा नेमका काय आहे? महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नेमका कोण? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मविआनं निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी करणा-या महयुतीवरच आता निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठरवण्याची वेळ आलीय. कारण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत अमित शहांनी मुख्यमंत्रिपदाबाबतचा फैसला विधानसभेच्या निकालानंतरच होणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे महायुतीनं मविआची कॉपी केल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावलाय.

विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात येणार नसल्याचे संकेत अमित शहांनी पुण्यातून दिले होते. त्यानंतरही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली जात होती. मात्र विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढण्याचे आदेश दिले असले तरी मुख्यमंत्रिपदाबाबत शाहांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलीय. तर यावेळी शहांनी महायुतीच्या जागांचा नवा प्रस्ताव दिलाय..

शाहांचा शिंदे-दादांना नवा प्रस्ताव?

देवेंद्र फडणवीस, भाजप, 155

एकनाथ शिंदे, शिंदे गट, 70-75

अजित पवार, राष्ट्रवादी (AP) -60-65

शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्यात येणार असली तरी महायुती मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करण्याचं कारण काय आहे? हे जाणून घेऊ..

सीएमपदाचा फैसला निकालानंतर का?

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केल्यास घटक पक्षाचे कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. मराठा चेहरा दिल्यास ओबीसी समाज दुरावण्याची भीती महायुतीला असल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगे फॅक्टरचा असलेला विरोध ही यामागचं एक कारण आहे.

महाविकास आघाडीने निवडणूकीच्या निकालानंतरच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची भूमिका घेतलीय. तर दुसरीकडे महायुतीनेही ज्यांच्या जागा अधिक त्यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकण्याच्या रस्सीखेचीत महायुतीतील पक्षांकडून पाडापाडीचं राजकारण होणार की एकदिलाने काम करून सत्तेपर्यंत पोहचणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime : "जीव होता तो माझा..." विवाहितेने आयुष्याचा दोर कापला, हातावर मन सुन्न करणारा मजकूर अन्...

IND Vs SA: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कशी असणार भारताची प्लेईंग ११; या खेळाडूचा पत्ता होणार कट?

Sunscreen Sun Protection: दररोज सनस्क्रीन लावल्याने व्हिटॅमिन D ची कमतरता होते का?

Vastu Tips: घरात झाडू कोणत्या दिशेला ठेवावा? तुम्हीही चूक करत असाल तर योग्य दिशा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी आल्यानंतर शेतात रमले

SCROLL FOR NEXT