Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला; म्हणाले, "लढाई लढण्यासाठी समन्वय..."

पुढील कोणतीही लढाई लढण्यासाठी समन्वय पाहिजे.", असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Ruchika Jadhav

Sanjay Raut: नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नाट्यमय घटना घडल्या. तांबे यांच्या खेळीने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. अशात आता यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"नाशिकमध्ये जे काही घडले यात कुणालाही दोष देता येणार नाही. तांबे यांनी केलेल्या चुकीला ते स्वत: जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही बोलता येणार नाही. मात्र जे काही घडले आहे त्यात महाविकास आघाडीमध्ये समन्वय असने गरजेचे आहे. पुढील कोणतीही लढाई लढण्यासाठी समन्वय पाहिजे.", असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. (Latest Political News)

तरच पुढील लढ्यात एकत्र लढता येऊ शकते

संजय राऊत तांबेंमुळे नाराजी व्यक्त करत पुढे म्हणाले की, " जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हाच समन्वय समितीची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा जसं सरकार चालवलं तसंच आता देखील एकोप्याने राहिलं पाहिजे. तरच पुढील लढ्यात एकत्र लढता येऊ शकते. विधान परिषदेत कॉंग्रेसमध्ये जरी गोंधळ झाला असला तरी तो महाविकास आघाडी म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे. "

मी कोणालाही दोष देत नाही

नागपूर आणि नाशिकच्या जागेबद्दल पुढे राऊत म्हणाले की, " आता घडलेल्या गोष्टींवरून मी कोणालाही दोष देत नाही. दोन्ही जागेसाठी काळजीपूर्वक निर्णय घेणे फार गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. यावरून आता कोणालाही दोष देता येणार नाही. नागपूरमध्ये वातावरण ठिक आहे. मात्र नाशिकचा घोळ झालाच. तांबे हे निष्ठावंत कुटुंब आहे त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास दाखवता येणार नाही.

नाशिक पदवीधर मतदार संघाची जागा महाविकास आघाडीने कॉंग्रेसला दिली. यात त्यांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले. मात्र सुधिर तांबे यांनी अर्जच भरला नाही. त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्षमधून अर्ज भरला आणि मुलासाठी तांबे यांनी माघार घेतली. या सर्वांमुळे नाशिकचे वातावरण चांगलेच नाट्यमय झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी बहिष्कार, आता CM च्या कार्यक्रमाला दांडी,फडणवीसांचा दम, तरीही शिंदेसेनेत नाराजी कायम

Maharashtra Live News Update: मुंबईत बॅनर कारवाईवरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

राज्याच्या राजकारणात नवी युती होणार?ठाकरेंनंतर आता आंबेडकर एकत्र येणार?

खूशखबर! म्हाडाकडून लवकरच भाडेतत्त्वावरील घरे मिळणार, प्रशासनाने उचललं महत्वाचं पाऊल

Maharashtra Politics: कार्यकर्त्यांनो, तुम्ही सतरंज्याच उचला! नेत्यांच्या घरात ६-६ जणांना उमेदवारी

SCROLL FOR NEXT