'मी मोदींना मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो'; नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य Saam TV
महाराष्ट्र

'मी मोदींना मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो'; नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य

'देशामध्ये कोरोना महामारी नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहेत.'

संजय डाफ

भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नरेंद्र मोदींबद्दल बोलताना जीभ घसरली असून मी नरेंद्र मोदी यांना शिव्या देऊ शकतो आणि मारूही शकतो असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे प्रचार सभे दरम्यान काही नागरिकांनी आपल्या समस्या नाना पटोलेंसमोर (Nana Patole) मांडल्या यावेळी पटोले कार्यकरत्यांना म्हणाले. आता आपली ताकद वाढली असून, ‘आपण पंतप्रधान मोदी यांना मारुही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असं ते यावेळी म्हणाले.

मात्र राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी (State President) देशाच्या पंतप्रधानानबद्दल असे आक्षेपार्ह वक्तव्य करणं कितपत योग्य आहे. असा सवाल आता उपस्थित होऊ लागला असून पटोले हे त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत आले असून त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हे देखील पहा -

दरम्यान देशामध्ये कोरोना महामारी नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहेत. गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी गॅस सिलिंडर दिले व आता पुढील काळात ज्याच्याकडे गॅस सिलिंडर आहे तो सधन घोषित करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे वक्तव्यही नाना पटोले (Nana Patole) यांनी केले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

Sanjay Raut: मुंब्रात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर!

Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

Vargamantri: निवडणुकीच्या धामधूमीत आता "वर्गमंत्री" कोण होणार? ट्रेलर आला समोर

SCROLL FOR NEXT