साठवण तलावाचा फोडलेला सांडवा बांधण्यास सुरुवात... विनोद जिरे
महाराष्ट्र

साठवण तलावाचा फोडलेला सांडवा बांधण्यास सुरुवात...

सांडव्याची उंची पूर्ववत करण्यात येत असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - धारूर Dharur तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचा फोडलेला सांडवा, पुन्हा बांधण्यास सुरुवात झाली असून ग्रामस्थांच्या आंदोलनास यश आले आहे. जनरेट्यामुळे पाटबंधारे विभागाने Irrigation Department दहाच दिवसात सांडवा Drain पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले आहे. सांडव्याची उंची पूर्ववत करण्यात येत असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.

हे देखील पहा -

आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल 17 वर्षानंतर पूर्ण झाले आहे. तलाव पूर्ण भरल्याने आरणवाडी, चोंराबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी येथील ग्रामस्थ समाधानी होते. मात्र, रस्ते विकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे अनर्थ झाला आणि तलावाचा सांडवा फोडण्यात आला. राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रस्त्याला पाण्यापासून धोका होऊ नये, म्हणूण पाणी विसर्ग करण्याचे पञ देताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले.

साठवण तलाव नवा असल्याने तलावाच्या दगडी भिंतीतून पाणी झिरपण्याची भिती व्यक्त करत खालील गावांच्या सुरक्षितेच्या नावाखाली सांडवा फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याला गावातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. मात्र विरोधाला न जुमानता सांडावा फोडत लाखो लिटर पाणी सोडून देण्यात आले.यानंतर ग्रामस्थांनी पेटून उठून सांडावा पूर्ववत करावा. यासाठी आंदोलन केले शेवटी प्रशासनाने पुन्हा सांडवा पूर्ववत करण्यास सुरुवात केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट; होडगी रोड पाण्याखाली

पार्कमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या; बॅटनं मारलं अन् गोळ्या झाडल्या, CCTVतून मारेकऱ्याची ओळख पटली

Cancer Alert: आताच सावध व्हा! नकळत या गोष्टींमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

Who is Petal Gahlot: जगासमोर पाकच्या पंतप्रधानांचे तोंड बंद केलं, खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत कोण आहेत?

Vastu Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडतात? जाणून घ्या शास्त्र

SCROLL FOR NEXT