नागपूरकरांसाठी चांगली बातमी! शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल (पहा व्हिडिओ)

नागपूर शहरात कोरोना नियंत्रणात
नागपूरकरांसाठी चांगली बातमी! शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल (पहा व्हिडिओ)
नागपूरकरांसाठी चांगली बातमी! शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल (पहा व्हिडिओ)Saam Tv
Published On

नागपूर - नागपूरकरांसाठी Nagpur एक चांगली बातमी समोर आहे. कोरोनाची Corona लाट उसळल्यानंतर नागपूर शहरात, पहिल्यांदाच काल कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल आता कोरोनामुक्तीच्या दिशे सुरु झाली आहे. परंतु नागरिकांनी यामुळे हुरळून न जाता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत Nitin Raut यांनी केले आहे.

६ ऑगस्ट ला झालेल्या रात्री १२ वाजे पर्यंत झालेल्या कोरोनाच्या चाचणीत एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे ही नागपूरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. नागपूर मध्ये गेल्या २४ तासात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही तर ग्रामीण भागामध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

तसेच गेल्या २४ तासात नागपुरात एकही रुग्णाचा झालेला नाही. सध्या पॉझिटिव्हीटी दर हा शून्यावर आला आहे. नागपूर शहरात ४ हजार ८५६ लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि यापैकी एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. आतापर्यंत नागपुर जिल्ह्यात ४ लाख ९२ हजार ९२५ कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. तर आतापर्यंत १० हजार ११७ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. सध्या नागपूर शहरात केवळ १४७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ग्रामीण भागात ३२ रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

नागपूरकरांसाठी चांगली बातमी! शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल (पहा व्हिडिओ)
गटारी निमित्त चिकन, मटण दुकानावर गर्दी...

परंतु अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची आवश्यकता आहे. येणारा काळ हा सणासुदीचा आहे त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळली पाहिजे, असे आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com