Police officials begin search operation after Congress woman candidate goes missing in Latur district. Saam Tv
महाराष्ट्र

ऐन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत खळबळ; काँग्रेसच्या महिला उमेदवाराचे अपहरण?

Congress Woman Candidate Suspected Kidnapped In Latur District: लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या महिला उमेदवार अंजना चौधरी बेपत्ता झाल्याचा संशय. पोलिस तपास सुरू असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबडा जिल्हा परिषद गटातून एसटी प्रवर्गातील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अंजना चौधरी यांचा अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अंजना चौधरी या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर प्रचारासाठी जाणार असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र, त्या त्यानंतर घरी परतल्या नाहीत. बराच वेळ उलटूनही संपर्क न झाल्याने कुटुंबीय आणि पक्ष कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

या घटनेनंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली असून, उमेदवाराच्या अपहरणाचा संशय व्यक्त करत अधिकृत निवेदन दिले आहे. उमेदवाराचा शोध घेण्यासाठी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास अवघे दोनच दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही घटना निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणारी ठरू शकते, अशीही चर्चा सुरू आहे.

पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, अंजना चौधरी यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत - नितेश राणे

Konkan Tourism : मालवणमध्ये लपलंय 'हे' सुंदर बेट, सौंदर्य पाहून परदेशातील मालदीव विसराल

Belly Fat: आहार नेहमीसारखाच तरीही तिशीनंतर ढेरी का वाढते? एक्सपर्टनं सांगितलं धक्कादायक करण

Kolhapur Crime: मेसेज करायला लावायचा,अभ्यासाच्या नावाने केबिनमध्ये बोलवून नको ते करायचा; प्राध्यापकाचे विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

Womens Day 2026 : लाडक्या बायकोला द्या कामापासून सुट्टी; खास तिच्यासाठी बनवा 'हा' चटपटीत पदार्थ, रेसिपी आहे खूपच सोपी

SCROLL FOR NEXT