DMKनं डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा जाहीर केला असला तरी पवारांच्या राष्ट्रवादीनं अजूनही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र त्यांच्या नेत्यांनी पाठिंब्याचे संकेत दिल्यामुळे मविआ आणि इंडिया आघाडीत भडका उडालाय. पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असं गृहीत धरून काँग्रेस नेत्यांचा चांगलाच संताप झालाय. त्यामुळेच की काय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी थेट पवारांवर खंजीर खुपसण्याचे गंभीर आरोप केले आहेत. तर राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष असून आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं सांगत पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी वडेट्टीवारांना सुनावलाय.
एवढंच नव्हे तर काँग्रेसनं पवारांना राष्ट्रवादीच्या फुटीवेळी दिलेल्या खंबीर पाठिंब्याची आठवणही करून दिलीय. 'गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी शरद पवार भक्कम आधार दिला होता', असं कॅप्शन देत काँग्रेसनं पोस्टद्वारे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केलीय..
काँग्रेसची पवार-सुळेंवर टीका
शरद पवार साहेबांना वयाच्या 85व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. आणि आता काय? परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.
दुसरीकडे काँग्रेसच्या टीकेमुळे पवारांच्या राष्ट्रवादीत चांगलीच नाराजी पसरलीय...इंडिया आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंनी तर दांडी मारलीच...मात्र त्यासोबत पक्षातील कुठलाच खासदार या बैठकीला गेला नाही... त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे...अशातच वडेट्टीवारांपाठोपाठ राऊतांनीही पवारांच्या खासदारांनी सत्तेसाठी माती खाल्ल्याची टीका केलीय...
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून पवारांनी काँग्रेसची कधीही साथ सोडली नाही. राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाल्यानंतरही पवारांचा गट काँग्रेससोबत राहिला. डिलिमिटेशनच्या मुद्यावर पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्यामुळे काँग्रेसनं थेट खंजीर खुपसण्याची भाषणा केलीय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खंजीर आणि गद्दारीची पुन्हा चर्चा सुरू झालीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.