कोल्हापूरच्या शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संजीवनीदेवी संजयसिंह गायवाड यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. शहरातील पंचगंगा स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संजय सिंह यांच्या निधनानंतर सन 2000 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी कॉँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला होता, त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या महिला व बालकल्याण समितीच्या राज्याध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती. तसेच 15 वर्षे त्या गोकुळच्या संचालिका होत्या. त्यांच्या पश्चात कर्णसिंह, इंद्रजीत आणि योगीराज ही तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रकृतीच्या कारणास्तव महिनाभरापासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचार सुरू असताना सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागाळा पार्क येथील जगजीवन हाईट्समध्ये त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गोकुळसह काँग्रेसमधे शोककळा पसरली आहे. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास नागाळा पार्कातून त्यांची अंत्ययात्रा काढली. पंचगंगा घाटावरील जुन्या वाड्यात त्यांचे पार्थिव नेण्यात आले. तेथे काळ थांबून पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शाहूवाडी मतदारसंघातील गायकवाड यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांसह माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, मालोजीराजे छत्रपती, गोकुळचे माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ, विश्वास पाटील, रणजीतसिंह पाटील, माजी संचालक अभिजीत तायशेटे, अजित नरके, किसन चौगुले, अंबरिषसिंह घाटगे आदी उपस्थित होते.
संजीवनी गायकवाड यांनी ‘गोकुळ’च्या पहिल्या महिला संचालिका म्हणून १९९२ ते २००७ या काळात काम केले होते. शाहूवाडीचे माजी आमदार दिवंगत संजयसिंह गायकवाड यांच्या आकस्मिक निधनानंतर २००० मध्ये झालेल्या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. त्यांच्या पश्चात ‘गोकुळ’चे संचालक कर्णसिंह गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराज व इंद्रजित अशी तीन मुले, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती भाग्यश्रीदेवी गायकवाड या स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.