Nashik Politics  Saam tv
महाराष्ट्र

Nashik Politics : नाशिकमध्ये 'सांगली' पॅटर्न; काँग्रेसचे २ इच्छुक उमेदवार निवडणूक लढण्यावर ठाम? नेमकं काय राजकारण शिजतंय?

nashik central assembly constituency : नाशिकमध्ये सांगली पॅटर्न पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या २ इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

Vishal Gangurde

तबरेज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

नाशिक : नाशिक विधानस मतदरासंघात लोकसभेचा सांगली पॅटर्न पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरु झालं आहे. एकीकडे ठाकरे गटाने नाशिक मध्य मतदारसंघात वसंत गिते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर या मतदारसंघात काँग्रेसकडून हेमलता आमि राहुल दिवे इच्छुक होते. ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतरही हेमलता पाटील यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून वसंत गिते मैदानात उतरणार असल्याचे निश्चित झालं आहे. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देखील मिळाला आहे. ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी येत्या दोन दिवसांत निर्धार मेळावा घेऊन सांगली पॅटर्न राबवणार असल्याची माहिती दिली.

हेमलता पाटील यांच्यासहित काँग्रेसचे राहुल दिवे यांनी मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी ही जागा ठाकरे गटाला सुटली तरी मध्य विधानसभेतून लढणार असल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी दिल्यास मैत्रीपूर्ण लढत देऊ अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे हेमलता पाटील यांनी स्पष्ट केले.

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राहुल दिवे यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर होण्याआधी प्रतिक्रिया दिली होती. 'आम्ही येत्या दोन दिवसात निर्धार मेळावा घेणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीची उमेदवारी परस्पर जाहीर करण्यात आली आहे. निर्धार मेळाव्यातून ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार असल्याचा ठराव आहे. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत सांगलीप्रमाणे परस्पर निर्णय घेतल्यास तर सांगली पॅटर्न नाशिक विधानसभेत राबवणार असल्याचे राहुल दिवे यांनी सांगितले.

सांगली पॅटर्न म्हणजे काय?

लोकसभा निवडणुकीत सांगलीत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. चंद्रहार पाटील यांना उमेदवार जाहीर केल्यानंतरही काँग्रेसला ही जागा हवी होती. ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसरीकडे काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत विशाल पाटील यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली. विशाल पाटील यांच्या भूमिकेने महायुतीच्या संजय पाटील यांच्यासहित ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT