Nana Patole and prakash ambedkar
Nana Patole and prakash ambedkar  Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole : प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपले दुकान चालवायला...'

मंगेश मोहिते

Nana Patole News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्याकडे त्यांचा प्रस्ताव नसल्याने आम्हाला प्रतिक्रिया देण्याचं काही काम नाही. त्यामुळे आपले दुकान चालवायला कोण काय बोलतात? आम्हाला सोयर सुतक नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

राज्यात ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली आहे. यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीत सामील होणार का, यावरून चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, महाविकास आघाडीचा भाग होण्याची आमची मुळीच इच्छा नाही, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर भाष्य करताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले,'शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले, त्या दिवशी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. आमच्याकडे प्रस्ताव नसल्यानं आम्हाला प्रतिक्रिया देण्याचं काही काम नाही. आपले दुकान चालवायला कोण काय बोलतात? आम्हाला सोयर सुतक नाही'.

'केंद्र सरकारने महागाई वाढून सर्वांचं जगणं मुश्किल केलं आहे. शिक्षणाचा खेळखंडोबा झाला. शेतकऱ्यांची गळचेपी केली जात आहे. त्यामुळे मूळ मुद्याहून विपरीत कोणी काम करत असेल, तर आम्हाला काही घेणं देणं नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलं. त्यानंतर त्यांनी त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत घुमजाव केला. यावरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले, 'पहाटेच्या सरकारचा आमचा काही संबंध नाही. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढणार आहोत. शिंदे-फडणवीसांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले नव्हते, असं पत्र राज्यपाल यांच्या कार्यालयातून आलेलं आहे.

'शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसबासाठी बिनविरोध निवडणुकीची आठवण करून देत असेल तर मागील चार निवडणुकीत काय झालं? त्याची आठवण त्यांनी करावी. तसेच आतापर्यंत भाजपकडून आमच्याकडे प्रस्ताव झाला नसल्यामुळे आमची तयारी सुरू केली आहे, असेही नाना पटोले पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : निलेश लंके, सुजय विखे पाटील यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT