Nana Patole on PM Narendra Modi saam tv
महाराष्ट्र

Nana Patole On PM Narendra Modi: 'मी PM मोदी यांच्यासारखा खोटारडा माणूस नाही'; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे.

विश्वभूषण लिमये

Nana Patole News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. 'मी पंतप्रधान मोदी यांच्या सारखा खोटारडा माणूस नाही. सैनिकांचा युनिफॉर्म तयार करणार म्हणाले होते. पण देशातलं डिफेन्सचं खासगीकरण केलं , अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. (Latest Marathi News)

नाना पटोले म्हणाले, ' जगाच्या पाठीवर दिसणारे कॉम्पुटर इंजिनियर ही राजीव गांधी यांची देण आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर एका काळ्या टोपीवाल्याला बसवलं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला'.

'मी पंतप्रधान मोदी यांच्या सारखा खोटारडा माणूस नाही. सैनिकांचा युनिफॉर्म तयार करणार म्हणाले होते,पण देशातलं डिफेन्सचं खासगीकरण केल आहे. चीनने आपल्या देशावर कब्जा केला, मात्र देशातलं ५६ इंचची छाती यावर बोलायला तयार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

'कोळी समाज काँग्रेस सोबत येऊ द्या, राज्यातील तलाव फ्री करून देतो. कोळी समाजाला नोकर नाही तर मालक करण्याचं काम काँग्रेस करणार आहे. मागचे दोन देशमुख मंत्री, त्यांनी संस्था काढून पैसे खाल्ले,यात त्यांची चूक नाही, त्यांना विचारच तसे दिले जातात, अशी टीका पटोले यांनी केली.

'औरंगाबादचे खासदार सांगत आहे की, नेते हिंसाचार घडवतात, असं त्याने सांगितलं, ते त्यातला एक्सपर्ट आहे, अशी टीका पटोले यांनी नाव न घेता खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे.

'सध्या कृत्रिम महागाई सुरू आहे. लोकांना गरीब करून गुलाम करण्यासाठी ही भाजपची नीती आहे. केंद्रातलं सरकार हे बनिया वृत्तीचं सरकार आहे, अशी टीका पटोले यांनी मोदी सरकारवर केली आहे.

'सुशीलकुमार शिंदे लोकसभेला थांबाण्यासाठी तयार नाहीत. तुम्ही जर जबाबदारी घेणार नसाल तर, मी या चांगल्या माणसाचा अपमान होऊ देणार नाही. मला सोलापूरची तर जागा जिंकलीच पाहिजे आणि माढाची पण जिंकली पाहिजे. मला देशाचा प्रधानमंत्री राहुल गांधी यांना करायचा आहे, असे पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सूनेची क्रूरता! आईसोबत मिळून सासूला झोडलं, जमिनीवर पाडून झिंज्या उपटल्या; VIDEO व्हायरल

Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू

Nashik : गोदावरीला पूर; जायकवाडी धरण ५२ टक्के भरलं | VIDEO

Mrunal Thakur Photos : जादू तेरी नजर; मृणालचं सौंदर्य पाहून काळजाचा ठोका चुकेल

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

SCROLL FOR NEXT