Nana Patole Accident Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला भीषण अपघात

Nana Patole Accident : भीलवाडा गावाजवळ काल रात्री अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून नाना थोडक्यात बचावले.

Ruchika Jadhav

Nana Patole Car Accident :

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काल रात्री अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून नाना थोडक्यात बचावले.

नाना पटोले यांना सुरक्षा असताना देखील हा अपघात झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये. नाना पटोले सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या विजय प्राप्त व्हावा म्हणून नाना दिवसरात्र एक करत दौरे घेत आहेत.

काल देखील नाना पटोलेंनी काही ठिकाणी प्रचार दौरे केले. दौरा आटोपून रात्रीच्या ते आपल्या ताफ्यासह स्वगावी निघाले होते. दरम्यान, भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने जबर धडक दिली. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही धडक बसली.

ट्रकची धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये कार पाठीमागच्या बाजूने पूर्णता दाबली गेली आणि तिचा चुराडा झाला. सुदैवाने नानांंना आणि कारमधील अन्य व्यक्तींना यात कोणतीही दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भंडारा पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT