Rahul Gandhi, Sharad Pawar 
महाराष्ट्र

"गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी पवारांना आधार दिला होता"; डिलिमिटेशन बिलावरून काँग्रेसचा व्हिडिओ

डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेसने राहुल गांधी आणि शरद पवार यांचा भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'गद्दारांची गर्दी असताना राहुल गांधींनी पवारांना आधार दिला होता,' असे कॅप्शन देत काँग्रेसने निशाणा साधला.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar-Rahul Gandhi डिलिमिटेशन बिलाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आपल्या सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे....या व्हिडिओत राहुल गांधी हे शरद पवारांचा हात घट्ट पकडून उभे असल्याचं दिसतंय. 'गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला होता', असं कॅप्शन काँग्रेसनं या व्हिडिओला दिलं आहे...तर आणखी एक पोस्ट करत काँग्रेसनं शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीकाही केली आहे...

काँग्रेसची सोशल मीडिया पोस्ट:

गद्दारांची गर्दी असताना राहुल गांधी यांनी शरद पवार यांना भक्कम आधार दिला होता, अशा आशयाचे कॅप्शन देत काँग्रेसने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा डिलिमिटेशन विधेयकास पाठिंबा असू शकतो, अशा चर्चांमुळे ही पोस्ट महत्त्वाची मानली जात आहे.

राज्यसभेतील पाठिंब्याची आठवण:

शरद पवार यांना वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिली आणि सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा मागितल्यानंतर राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांनी सकारात्मक भूमिका घेत स्वतःच्या जागेचा दावा बाजूला ठेवून पाठिंबा दिला होता, असा संदर्भ यामध्ये देण्यात आला आहे.

एकीकडे काँग्रेसची ही भावनिक पोस्ट समोर आली असताना, दुसरीकडे परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसनं नेमकी काय केली पोस्ट?

शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता…

मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली.

आणि आता काय?

परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.

इंडिया आघाडीच्या बैठकीला पवार गट जाणार नाही

दिल्लीत आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला शरद पवार गटाचा एकही खासदार उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. सुरुवातीला या बैठकीला खासदार निलेश लंके हजेरी लावणार असल्याची चर्चा होती; मात्र ते आज गड-किल्ले स्वच्छता मोहिमेसाठी तोरणा किल्ल्यावर आहेत. तर दुसरीकडे, खासदार भास्कर भगरे हे देखील महाराष्ट्रातच असल्याने बैठकीला जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे या बैठकीत पक्षाच्या वतीने दिल्लीतील एखादा प्रतिनिधीच सहभागी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सकाळी सकाळी पश्चिम रेल्वेला लेटमार्क, ३० मिनिटे उशिराने धावतेय लोकल

Ladki Bahin Yojana : आणखी ४५ हजारांहून अधिक 'लाडक्या बहिणी' अपात्र; ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याची अपडेट समोर

Maharashtra Weather Update: धुळे @11°...!विदर्भ, उत्तर महाराष्ट्र गारठला; राज्यात आज कसं असेल हवामान, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान

Delimitation Bill : ज्ञानेश कुमार यांच्याकडे जाणार मतदारसंघ पुनर्रचनेची सूत्रं? नव्या विधेयकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

BJP MP : भाजप खासदाराच्या कारला भीषण अपघात; हात फ्रॅक्चर, गाडीत होते ४ जण, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT