Rashmi Barve latest news
Rashmi Barve  Saam TV
महाराष्ट्र

Rashmi Barve : जात वैधता प्रमाणपत्र प्रकरण : रश्मी बर्वे यांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाहीच

Ruchika Jadhav

Rashmi Barve latest news :

काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे जात पडताळणी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने रश्मी बर्वेंची याचिका फेटाळली आहे. जात पडताळणीवर हायकोर्टाच्या निकालाविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, आज सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वेंनी काँग्रेस उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जात पडताळणीमध्ये हा अर्ज रद्द झाला. या प्रकरणी न्यायालयाने रश्मी बर्वेंना कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यावर अंतरिम स्थगिती दिलीये.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणी सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं रश्मी बर्वेंची याचिका फेटाळून लावली आहे.

रश्मी बर्वे यांनी याआधी मुंबई उच्च न्यायालयात जात पडताळनी समितीच्या निर्णयाविरोधात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाने समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली, पण निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

दरम्यान, रश्मी बर्वें यांनी एबी फाॅर्म भरताना यात दुसऱ्या क्रमांकावर त्यांच्या पतीचे नाव दिले होते. रश्मी बर्वेंचं प्रमाणपत्र रद्द झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून श्यामकुमार बर्वे यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यामुळे रामटेकमधून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे असतील अशी शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे Malad सबवे पाण्याखाली

Mumbai Breaking: धक्कादायक! पावसामुळे रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी; धावत्या लोकलमधून महिला पडली, दोन्ही पाय गमावले VIDEO

Marathi Live News Updates : मुंबईतील पावसाचा विमानसेवेवर परिणाम; मंत्री, आमदारांचा खोळंबा

Bhandara News : अंगावर घराची भिंत कोसळून तरुणाचा मृत्यू; करांडला येथील घटना

Ishan Kishan: 'जे लोक आज शिवीगाळ करताय, तेच..' हार्दिक पंड्यावर टीका करणाऱ्यांवर इशान किशन जोरदार गरजला

SCROLL FOR NEXT