काँग्रेसच्या ताब्यातली मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त कैलास चौधरी
महाराष्ट्र

काँग्रेसच्या ताब्यातील मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त

उमरगा तालुक्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेली मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : उमरगा Umarga तालुक्यातील काँग्रेसच्या Congress ताब्यात असलेली मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात आली आहे. किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने धान्य खरेदी करणे, कडता व सॅम्पल, ग्रेडिंग व्यवस्था नसणे,अशा विविध कारणाच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत बाजार समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे देखील पहा-

महेश गव्हाणे यांनी एप्रिल 2019 मध्ये या संदर्भात तक्रार दिली होती. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांनी तक्रारीबद्दल जिल्हा उपनिबंधकांना बाजार समिती संचालक मंडळावर कारवाई करण्यासाठी सूचित केले होते. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख Vishwas Deshmukh यांनी हा आदेश काढला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती मुरूम विद्यमान मंडळ यांनी त्यांना सोपवलेली कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरल्याने व संचालक मंडळास दिलेल्या वैधानिक निर्देशांचे अनुपालन केले नसल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच सहाय्यक निबंधक पी.एल.शहापूरकर यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चुकीचा तपास नडला; जिवंत मुलीला मृत ठरवून वडिलांना-भावाला केली होती अटक, दोन पोलीस निरीक्षकांचे निलंबन

Accident: हुल्लडबाज ट्रक ड्रायव्हरचा धोकादायक ओव्हरटेक, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक, राज्यसभेचा उमेदवार ठरणार?

मोठी बातमी! परीक्षेच्या काही मिनिटांआधी MSc नर्सिंगची परीक्षा रद्द, अचानक नेमकं काय घडलं?

कौटुंबिक वाद शिगेला पोहोचला, संतापलेल्या पत्नीनं नवऱ्याला 'नको तेथे मारलं', अन्...; मुंगेरमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT