Vishwajeet Kadam Saam TV
महाराष्ट्र

Vishwajeet kadam : वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रयोग सुरू; सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम यांच्याकडून सूचक संकेत

VIshwajeet kadam on sangli lok sabha : महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रयोग सुरू आहेत, असं म्हणत आमदार विश्वजीत कदम यांनी सूचक संकेत दिले आहेत.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

नागपूर : महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. तरी दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून अंतर्गत तिढा कायम आहे. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेसाठी इच्छुक उमेदवार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम आग्रही आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेल्या सांगलीच्या जागेसाठी विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांची भेट घेतली. मात्र तरीही त्यांचे समाधान झाले नसल्याचे समोर आले आहे. याचदम्यान, 'महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रयोग सुरू आहेत, असं म्हणत आमदार विश्वजीत कदम यांनी सूचक संकेत दिले आहेत.

काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी नागपुरात वरिष्ठांची भेट घेतली. वरिष्ठांच्या भेटीनंतर विश्वजीत कदम यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संवाद साधताना विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेवरून मोठं ववक्तव्य केलं.

'वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात सुरु आहे. यातून काय घडतं ते त्या निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कळत असतं, त्यामुळे यावर जास्त बोलणार नाही, असं म्हणत विशाल पाटील यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचा पर्याय असल्याचे संकेत दिले आहेत.

विश्वजीत कदम यांच्याकडून मोठे संकेत

काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी नागपुरात वरिष्ठांची भेट घेतली. वरिष्ठांच्या भेटीनंतर विश्वजीत कदम यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संवाद साधताना विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेवरून मोठं ववक्तव्य केलं. 'वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात सुरु आहे. यातून काय घडतं ते त्या निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कळत असतं, त्यामुळे यावर जास्त बोलणार नाही, असं म्हणत विशाल पाटील यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचा पर्याय असल्याचे संकेत दिले आहेत.

विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत बोलताना कदम म्हणाले, 'काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही. मात्र शेवटच्या क्षणालाही एबी फॉर्म जोडला जाऊ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी एक काँग्रेस पक्ष आणि एक अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत'.

'राज्याच्या आणि देशाच्या ज्येष्ठ नेत्यांची जबाबदारी आहे. सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून आम्ही सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले आहे. सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसला मिळावी, त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला. पण सांगलीची परिस्थिती सध्या उद्भभवली, त्याला सगळे आपण साक्षीदार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala To Nighoj : लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर पाहा नैसर्गाचे अदभूत सौंदर्य, One Day Trip साठी ठिकाण

Maharashtra Live News Update : प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध - डॉ.शिवानंद भानुसे

Khakhra Recipe : गुजरात स्पेशल कुरकुरीत खाकरा, गरमागरम चहासोबत करा टेस्ट

Aids: किती पार्टनर्ससोबत शारीरिक संबंध ठेवल्याने एड्सचा धोका संभावतो?

Maharashtra Politics: देवेंद्र पावले, नाहीतर रामराजे नाईक जेलमध्ये गेले असते; जयकुमार गोरेंचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT