महाराष्ट्र

Balasaheb Thorat Resign: बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर सत्यजित तांबे आणि मुलगी जयश्री यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर आमदार सत्यजित तांबे आणि मुलगी जयश्री थोरात यांची प्रतिक्रिया आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन बनसोडे

संगमनेर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर ही मोठी अपडेट आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता आलेली आहे.

आता बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर आमदार सत्यजित तांबे आणि मुलगी जयश्री थोरात यांची प्रतिक्रिया आली आहे.

साहेबांची (बाळासाहेब थोरात) माझ्याबरोबर तशी काही चर्चा नाही. साहेब जेव्हा व्यथित होतात तेव्हा आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतं. मात्र यावर मी काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया देत बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी राजीनाम्याच्या प्रश्नांवर बोलण टाळलं. (Latest Marathi News)

बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कुठलाही संपर्क नाही - सत्यजित तांबे

बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कुठलाही संपर्क झालेला नाही. बाळासाहेब थोरात साहेबांनी जर पत्र लिहिलं असेल तर १०० वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या परिवारावर ही वेळ का येत आहे? यावर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं सत्यजित तांबे यांनी म्हटलं.

काँग्रेसमध्ये गट वगैरे असतील असं मला वाटत नाही.मला जे बोलायचं होतं ते मी पत्रकार परिषदेत सविस्तर मुद्दे घेऊन बोललो. मी माझी भूमिका पुराव्यानिशी मांडली आहे, त्यामुळे मला आता काही बोलायचं नाही. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या माणसावर ही वेळ येते तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं तांबे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेपरफुटी, खासगीकरण, आरक्षण; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज ठाकरे काय म्हणाले?

Tuesday Horoscope: कोणत्या राशींचा दिवस खास? धनु, मकर, कुंभसह या राशींना मिळणार आनंदाची बातमी

Maharashtra News Live Update: हिंगोली शहरातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग

असे गुरुजी प्रत्येक शाळेत हवेत, विद्यार्थ्यांसाठी गुरुजींचा 'हेअर कटिंग पॅटर्न'

निवडणूक आयोगाविरोधात न्यायमूर्ती मैदानात, 'SIRमुळे लोकशाहीवर मोठं संकट'

SCROLL FOR NEXT