Praniti Shinde On VBA Saam Tv
महाराष्ट्र

Praniti Shinde: 'वंचितने ती पोस्ट काढावी', भाजपचं नाव घेत प्रणिती शिंदे म्हणाल्या...

Praniti Shinde On VBA: वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांचा भाजपच्या पोस्टरवर फोटो लावत, भाजप प्रवेशाचा मुहूर्त कधी? असा सवाल केला आहे.

विश्वभुषण लिमये

Praniti Shinde On Vanchit Bahujan Aghadi

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांचा भाजपच्या पोस्टरवर फोटो लावत, भाजप प्रवेशाचा मुहूर्त कधी? असा सवाल केला आहे. प्रणिती यांनी एक वक्तव्य केलं होतं, त्यानंतर वंचितने ही पोस्ट केली आहे. यावरच आता आपली प्रक्रिया देत प्रणिती शिंदे म्हणाल्या आहे की, ''मी जी टीका केली त्यामध्ये मी कोणाचेही नाव घेतलेलं नाही. त्यामुळे वंचितने ती पोस्ट काढावी.''

त्या म्हणाल्या आहेत की, ''मी फक्त म्हणाले होते की, जे कोणी काँग्रेस, मविआ किंवा इंडिया आघाडीच्या मतांचे विभाजन करतात ते भाजपला मदत करतात. हे साहजिकच आहे, त्यात असं ट्वीट का करण्यात आलं, माहित नाही.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ''वंचितने असे का केले, हे मला माहिती नाही. मी यापूर्वीही सांगितले की, काँग्रेस माझ्या रक्तात आहे. याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील. यातच वंचितने असे का केले, कालपर्यंत आम्ही सोबत होतो. माझे प्रामाणिक मत आहे की, भाजपविरोधी लोकांनी एकत्र आले पाहिजे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगते की, जे कोणी काँग्रेस मविआविरोधात काम करतात ते भाजपाला मदत करतात.''  (Latest Marathi News)

शिंदे पुढे म्हणाल्या की, ''मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. मात्र वंचितने काय गृहीत धरून ती पोस्ट केली, हे माहित नाही. मात्र ती पोस्ट त्यांनी काढावी. लोकात असा चुकीचा संदेश पसरवणे योग्य नाही.''

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांच्याविरोधात ट्विटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे?'' यावरच प्रतिक्रिया देताना प्रणिती शिंदे यांनी ही पोस्ट काढण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dalimb Juice Recipe: थंडीत डाळिंबाचा टेस्टी आणि फ्रेश ज्यूस नक्की प्या, वाचा ही सोपी रेसिपी

AC Fridge Price Hike: २०२६ च्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका; AC, फ्रिजच्या किंमती वाढल्या

एकाच वेळी दोघांना एबी फॉर्म! उमेदवाराने दुसर्‍याचा AB फॉर्म गिळला अन् विषयच संपवला, पुण्यात नेमकं काय घडलं?

Nagpur Politics: का रे दुरावा! नवऱ्याची भाजपसोबत बंडखोरी, माजी महापौरांच्या डोक्यात तिडीक गेली; सासर सोडून थेट माहेर गाठलं

Stress Relief Techniques: ताणतणावाला करा Bye Bye! रोज करा ही 5 कामं, टेन्शन फ्री जगाल

SCROLL FOR NEXT