raj thackeray and yashomati thakur  saam tv
महाराष्ट्र

Yashomati Thakur : 'भाड्याने आणलेले लोक बोलत असतील, तर... ';राज ठाकरेंवर यशोमती ठाकूर यांचा नाव न घेता हल्लाबोल

राज ठाकरेंच्या टीकेला काँग्रेसच्या महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Yashomati Thakur News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती. 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी नाही' असं विधान राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात केलं. राज ठाकरेंच्या टीकेला काँग्रेसच्या महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

यशोमती ठाकूर म्हणाल्या, 'राहुल गांधी खरं बोलतात. जे वास्तविक आहे तेच मांडतात. सावरकरांचे माफीनाम्याची प्रत सर्वांकडे आहे. राहुल गांधी यांच्या कुटुंबाने इतिहास घडवला'.

'मात्र, जर कोणी भाड्याने आणलेले लोक बोलत असतील, तर त्यांची पात्रता तीच आहे, अशी खरमरीत टीका राज ठाकरे यांचं नाव न घेता आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केली. यशोमती ठाकूर यांच्या टीकेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागणार आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

'देशांत फक्त जात-पात आणि महापुरुषांच्यावर टीका करणं इतकंच सुरु आहे. मध्यंतरी महाराष्ट्रात म्हैसूर सॅन्डल सोप (राहुल गांधी ) हे सावरकरांबद्दल वाट्टेल ते बरळून गेले. काय माहिती आहे सावरकरांबद्दल तुम्हाला? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

'राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. राहुल गांधी हे सावरकरांवर बोलणार, भाजप नेहरूंबद्दल बोलणार, मग अजून कोणतरी अजून एखाद्या महापुरुषांवर बोलणार. हे किती दिवस चालणार, ज्यांनी देशासाठी आयुष्य दिलं त्या सगळ्या महापुरुषांना का बदनाम करताय? असा सवाल देखील राज ठाकरेंनी भाषण करताना उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT