Vijay Saam
महाराष्ट्र

Beed: धसांचे आरोप गंभीर, उच्चस्तरीय चौकशी करा; भाजप आमदारासाठी काँग्रेस नेते आले धावून, म्हणाले..

Congress Leader Vijay Wadettiwar on BJP MLA: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुरेश धस यांच्या आरोपाला गांभीकर्याने घेत प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, असं वडेट्टीवार म्हणाले.

Bhagyashree Kamble

खोक्या प्रकरणाच्या आडून, माझ्या हत्येचा प्लॅन रचला होता, असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. तसेच धनंजय मुंडेंचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर आरोप केले आहेत. धसांनी केलेल्या खुलाशावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "सरकारने याची गंभीर दखल घेत, आरोपीवर कारवाई करण्यात यावी", असं वडेट्टीवार म्हणालेत.

विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

"धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोघे सत्तेतील व्यक्ती आहेत. ते एकमेकांवर वारंवार आरोप करत आहेत. याचा अर्थ स्पष्ट होतो की गुंडगिरी करणारी माणसं आता सत्तेत आहे", असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

"धस यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे", असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. "तसेच राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि आरोपींवर कारवाई करावी", अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

"सतीश भोसले प्रकरणाच्या आडून माझा खुनाचा प्लॅन रचला होता. बिश्नोई समाजाची लोक मुंबईत आणण्यात आली होती. त्यांना खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं, याबाबत सांगितलं. माझी हत्येचा कट आखला होता", असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

मुंडेंवर घणाघाती टीका

"परळीचे मुंडे आष्टीत आले, सुरेश धसला खोक्यानं हरणाचं मांस पुरवलं, असं त्यांनी आष्टी मतदारसंघात सांगितलं", असा आरोप धनंजय मुंडे यांचं नाव न घेता धसांनी केला आहे. "१६ वर्षे मी माळकरी राहिलो आहे. पण डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी आता खातो. हरणाचं मांस खाण्यापर्यंत मी अजून गेलेलो नाही. मी प्राणी आणि पक्षी प्रिय आहे", असंही धस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांरपर्यंत ही गोष्ट पोहोचवणार

"बिष्णोई समजाच्या दहा ते बारा लोकांना मुंबईत आणलं आणि त्यांना उपोषणाला बसवलं. त्यांना विमानाने आणलं आणि सांगितलं याप्रकरणावर बोलायचं. सुरेश धसला हरणाचं मांस खोक्याने पुरवले, असे दाखवण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी माझ्या हत्येचा कट रचला. यात कोणाचा सहभाग आहे, हे मला ठाऊक आहे, ते देखील मी सांगेन. ही बाब मुख्यमंत्र्यांना सांगणार", असं धस म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT