dhananjay munde prithviraj chavan 
महाराष्ट्र

मोदींनी माफी मागावी : पृथ्वीराज चव्हाण; धैर्याचा विजय : मुंडे

आज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कृषी कायदाबाबत माेठी घाेषणा केल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत

साम न्यूज नेटवर्क

सातारा : पंतप्रधान नरेंद्र माेदी (narendra modi) यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकामुळेच कृषी कायदा मागे 3 Farm Laws To Be Cancelled घेण्याचा निर्णय घेतला आहे असे आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी शेतकऱ्यांनी एकजुटीने दिलेल्या लढ्याला यश आले अशी भावना व्यक्त केली. दरम्यान शेतकरी नेते सदाभाऊ खाेत यांनी आजचा दिवस हा शेतक-यांसाठी काळा असल्याचे म्हटले तर स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हा एेतिहासिक विजय असल्याचे स्पष्ट केले.

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काळे कृषी कायदे मागे घेणे हा शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे अशी भावना व्यक्त केली आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकामुळेच हा निर्णय घेतला. पण या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला, याला जबाबदार कोण? तसेच अन्नदात्यांना देशद्रोही, खालिस्तानी म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी असे श्री. चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांनी एकजुटीने दिलेल्या लढ्याला यश आले अशी भावना व्यक्त केली. केंद्र सरकारने तीनही जाचक कृषी कायदे रद्द केले. हा शेतकऱ्यांच्या धैर्याने दिलेल्या लढ्याचा विजयच म्हणावा लागेल असे मुंडे यांनी नमूद केले. या लढ्यात बलिदान दिलेल्या शेतकरी बांधवांना नमन. किसान एकता जिंदाबाद! जय किसान...! असेही मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT