Rahul Gandhi Karnataka Election Result 2023 Saam TV
महाराष्ट्र

Karnataka Election Result: "राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने देशातील राजकारणाची दिशा बदलली"

Karnataka Election Result 2023: "राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे".

Satish Daud

Karnataka Election Result 2023: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या जनतेने धर्मांध, हुकुमशाही वृत्तीला सपशेल नाकारलं सर्वसमावेशक लोकशाही मानणा-या काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही कर्नाटक प्रमाणे भाजपचा सफाया होईल, असंही नाना पटोले म्हणाले. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं असून भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत.

काय म्हणाले नाना पटोले?

कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या भ्रष्ट सरकारला पराभूत करून काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. काँग्रेस पक्षाने महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढलेला भ्रष्टाचार या जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवर निवडणूक लढवली. भारतीय जनता पक्षाने मात्र नेहमीप्रमाणे धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेतला, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर जळत असतानाही कर्नाटकमध्ये रोज सभा घेऊन धार्मिक ध्रुवीकरण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होते पण कर्नाटकच्या जनतेने त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले. कर्नाटकातील जनता भाजप सरकारच्या ४० टक्के कमीशनखोरीला कंटाळली होती, असंही पटोले म्हणाले.

नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासह कोणत्याही भाजप नेत्यांनी कर्नाटकच्या मुद्द्यावर निवडणूक न लढवता निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला पण कर्नाटकच्या जनतेने तो हाणून पाडला. या उलट काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी आपल्या सभांमधून कर्नाटकच्या सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप जनतेपुढे मांडला त्यावर जनतेने विश्वास व्यक्त केला आणि काँग्रेस पक्षाला विजयी केले, असंही पटोले म्हणाले.

"भारत जोडो यात्रेने देशातील राजकारणाची दिशा बदलली"

राहुलजी गांधी यांची भारत जोडो २१ दिवस कर्नाटकात होती. ही यात्रा ५१ विधानसभा मतदारसंघातून गेली होती यातील ३९ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. कन्याकुमारी ते श्रीनगर या ४ हजार किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेने देशातील राजकारण बदलले आहे. या बदलांचे प्रतिबिंब आजच्या निकालातून दिसून आले आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षांची सरकारे पाहणाऱ्या, ED, CBI इन्कम टॅक्स या सारख्या संस्थांचा वापर करून विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पराभूत करून कर्नाटकच्या जनतेने भाजपचा हुकुमशाही वृत्तीला जोरदार चपराक लगावली आहे. राहुलजी गांधी यांच्यावर खोट्या केसेस करून त्यांचे लोकसभा सदस्यत्व काढून घेणाऱ्या आणि त्यानंतर लगेचच त्यांना बेघर करण्याच्या भाजप सरकारच्या कृतीविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप होता, असंही पटोले म्हणाले.

कर्नाटकचे ४० टक्के कमीशनवाले भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे भाजपचे डबल भ्रष्ट सरकारची अवस्था सारखीच असून कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातील जनता ही आगामी लोकसभा विधानसभेत परिवर्तन घडवून भाजप आणि शिंदेच्या भ्रष्ट टोळीला पराभूत करेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day 2025 Live Update: पीएम मोदींनी सलग १२ व्यांदा लाल किल्ल्यावरून केलं ध्वजारोहण

Success Story: IIT,IIM मधून शिक्षण, लंडनमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS दिव्या मित्तल यांचा प्रवास

Maharashtra Politics : आंबेडकर-गांधी एकत्र लढणार? लोकशाही वाचवण्यासाठी 'वंचित'चं राहुल गांधींना पत्र, VIDEO

Fake Voter Scam : महाराष्ट्रातही व्होट चोरी? पैठणमध्ये 23 हजार मतदार बोगस? VIDEO

Friday Horoscope : भगवान श्रीकृष्णाची कृपा होणार; 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT