nana patole narendra modi
nana patole narendra modi SaamTV
महाराष्ट्र

ही तात्पूरती व्यवस्था, खाेटं बाेलणं माेदींचे कार्य : पटाेले

अभिजीत घोरमारे

भंडारा : खाेटे बाेलणे हे पंतप्रधान नरेंद्र माेदींचे (narendra modi) आणि भाजपचे हे सर्वांत महत्वाचे कार्य आहे. हे पुढच्या काळात चालणार नाही. त्यामुळे देशातील शेतक-यांची पंतप्रधान नरेंद्र माेदींनी माफी मागावी. परंतु त्यांनी शेतकरी विराेधी कायदा या पुढं आणणार नाही असेही जनतेस आश्वासित केले पाहिजे अशी भावना काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले (nana patole) यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन कृषी कायदा मागे Farm Laws To Be Repeal घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खाेत, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील यांनी या निर्णयावर आपआपली मत व्यक्त केली.

नाना पटाेले म्हणाले माेदी सरकारचे शेतकरी विराेधी धरणातील लपलेला विषय अद्याप पुढे आलेला नाही. पाच राज्यातील निवडणुकीवर डाेळा ठेऊन हा कायदा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपती पदाची निवडणुक डाेळ्यासमाेर ठेऊन आमदार कमी झाले नाही पाहिजेत याची काळजी माेदींनी घेतली आहे. त्यामुळेच आजचा हा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. शेतक-यांचे आंदाेलनात लखीमपूरला मंत्र्यांच्या मुलाने शेतक-यास मारल्याची घटना आजही ताजी आहे. परंतु उत्तर प्रदेशातील मंत्री आजही माेदी सरकारमध्ये कायम आहे. त्यामुळे ही तात्पूरती व्यवस्था आहे. खाेटे बाेलणे हे माेदींचे आणि भाजपचे हे सर्वांत महत्वाचे कार्य आहे. हे पुढच्या काळात चालणार नाही. त्यामुळे देशातील शेतक-यांची पंतप्रधान नरेंद्र माेदींनी माफी मागावी. परंतु त्यांनी शेतकरी विराेधी कायदा या पुढ आणणार नाही हे त्यांनी आश्वासित केले पाहिजे असेही पटाेलेंनी नमूद केले.

शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींनी ‘आंदोलनजीवी’ म्हणत हिणवलं होतं. आज काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा अहंकारी मोदी सरकारला करावी लागली. हा ‘आंदोलनजीवी शेतकऱ्यांचा’ विजय असल्याची भावना नाना पटाेले यांनी व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT