Congress leader Krishna Kumar Pandey death Saam TV
महाराष्ट्र

Congress : भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेत्याला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू

नांदेडमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेस (Congress) नेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे

साम टिव्ही ब्युरो

Congress Bharat Jodo Yatra : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेडमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेस (Congress)  नेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्ण कुमार पांडे असं मृत्युमुखी पडलेल्या नेत्याचं नाव आहे.

कृष्ण कुमार पांडे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. प्राप्त माहितीनुसार, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यात्रा नांदेडमध्ये आल्यानंतर पांडे यांनी यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केले. यादरम्यान, पांडे यांना श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वी वाटेतच पांडे यांचा मृत्यू झाला होता.

कृष्ण कुमार पांडे हे मूळ नागपुरचे होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच के पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी दु:ख व्यक्त करत पांडे यांना श्रद्धांजली वाहली.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये दाखल झाली आहे. हजारो काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत. अनेकांच्या हातात मशाली आहेत. राहुल गांधी यांचे महाराष्ट्रात आगमन होताच प्रचंड फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. मशाल हाती घेऊन हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते लोक सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांनी स्वतः आपल्या हातात मशाल घेऊन पुढे होते. प्रचंड उत्साह आणि भारत जोडोच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मशाल यात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय होती. सोमवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटाला सुरू झालेली मशाल पदयात्रा चाळीस मिनिटे पुढे येऊन देगलूरमध्ये पोहचली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhang Tukaram: हा मराठी अभिनेता झळकणार खलनायक अवतारात; 'अभंग तुकाराम'मध्ये साकारणार खास भूमिका

डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न तुटलं; मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांती पुरस्कार

Narnala Fort History: ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण, अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला माहितेय का? जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

Heart disease symptoms: 'ही' ५ लक्षणं दिसली तर समजा एंजियोप्लास्टी करण्याची आहे गरज; वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका

SCROLL FOR NEXT