Dr. Satyendra Bhusari  Saam TV marathi News
महाराष्ट्र

Train Accident : मुंबईहून घराकडे निघाले, कसारा घाटात मृत्यूने गाठले, रेल्वेतून पडून काँग्रेस नेत्याचं निधन

Dr. Satyendra Bhusari Kasara Ghat train accident news ; मुंबईहून चिखलीकडे परतताना कसारा घाटात रेल्वेतून पडून काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा मृत्यू झाला. या घटनेने चिखलीत शोककळा पसरली आहे.

Namdeo Kumbhar

  • काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा कसारा घाटात रेल्वेतून पडून मृत्यू झाला.

  • मुंबईवरून चिखलीकडे परतताना हा अपघात घडला.

  • नाशिक रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

  • चिखली तालुका काँग्रेस आणि स्थानिक राजकारणात शोककळा पसरली आहे.

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Mumbai to Buldhana journey turns tragic for Congress leader: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील काँग्रेसला जबर धक्का देणारी घटना घडली आहे. चिखली तालुका काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ सत्येंद्र भुसारी यांचं निधन झाले आहे. कसारा घाटात रेल्वेतून पडून त्यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिखलीवर शोककळा पसरली असून सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

सत्येंद्र भुसारी हे काही कामासाठी मुंबईला आले होते. काम आटोपल्यानंतर ते रेल्वेने चिखलीकडे निघाले होते. पण कसारा घाटात काळाने घाला घातला. मुंबईवरून चिखलीकडे परतत असताना कसारा घाटात रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेतून पडलेल्या भुसारी यांना तत्काळ नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला

सत्येंद्र भुसारी यांच्या अकस्मात निधनानं चिखलीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. चिखली तालुक्यात शोककळा पसरली आहे. डॉ भुसारी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मात्र जबर धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भुसारी यांचं निधन झाल्याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. भुसारी यांची चिखली तालुक्यात वचक होती. भुसारी यांचा दांडगा जनसंपर्क होता, पण त्यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस आणि भुसारी कुटुंबाला मात्र धक्का बसलाय.

राजकीय वर्तुळात शोककळा

डॉ. सत्येंद्र भुसारी हे काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली होती. दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेसचे निरीक्षक म्हणून त्यांनी संभाव्य उमेदवारांची बैठक घेतली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी जिल्हापरिषद निवडणुकीत ते इसोली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढणार होते. भला माणूस, आपला माणूस म्हणून त्यांचे सर्वपक्षीय मित्रत्वाचे संबंध होते. मुळचे भोरसा भोरसी येथील असणारे डॉ. सत्येंद्र भुसारी सध्या चिखली शहरातील गांधीनगरात राहत होते. मुंबईवरून परत येत असताना कसारा घटात रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला. डॉ. भुसारी यांच्या निधनाने चिखलीच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News : तब्बल १२००० कोटींचा घोटाळा, जेपी ग्रुपच्या एमडीला ईडीने ठोकल्या बेड्या

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

NHAI Toll System : टोलनाक्यावरील रांगेपासून सुटका, 'या' हायवेवरून आता सुसाट प्रवास, केंद्र सरकारने आणली नवी योजना

Land Calcualtion: आता शेतजमीनीची मोजणी फक्त २०० रुपयात होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र, सोलापुरातील राजकारण फिरणार

SCROLL FOR NEXT