Nitin Raut : राज्य अंधारात गेल्यास फक्त काँग्रेस जबाबदार नाही; ऊर्जामंत्र्यांचे धक्कादायक विधान Saam TV
महाराष्ट्र

राज्य अंधारात गेल्यास फक्त काँग्रेस जबाबदार नाही; ऊर्जामंत्र्यांचे धक्कादायक विधान (पहा Video)

राज्यात सध्या मोठी कोळसा टंचाई आहे, कोळसा खानींमध्ये मॅानिटरिंगसाठी महाजनकोचे अधिकारी बसवलेत. पुरेसा कोळसा मिळाला नाही तर राज्यात लोडशेडिंगची वेळ येऊ शकते.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : 'राज्यात महावितरणची स्थिती बिकट आहे, राज्य सरकारच्या नगरविकास, ग्रामविकास खात्याकडे जवळपास आठ हजार कोटींची थकबाकी सरकारने महावितरणला दिली नसून उद्योगांना दिलेल्या अनुदानाची ३ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम दिली नसल्याने महावितरण संकटात आहेत. राज्य अंधारात गेलं तर फक्त काँग्रेस जबाबदार राहणार नाही, तर संपूर्ण महाविकास आघाडी जबाबदार राहिल, त्यामुळे राज्य सरकारने महावितरणला निधी द्यावा” अशी मागणी ऊर्जामंत्री डॅा. नितीन राऊत यांनी केलीय.

पहा व्हिडीओ -

राज्यात सध्या मोठी कोळसा टंचाई -

राज्यात सध्या मोठी कोळसा टंचाई आहे, कोळसा खानींमध्ये मॅानिटरिंगसाठी महाजनकोचे अधिकारी बसवलेत तसंच पुरेसा कोळसा मिळाला तर राज्यात लोडशेडिंगची वेळ येऊ शकते. त्यामुळं राज्य सरकारने नगरविकास, ग्रामविकास, उद्योगांच्या अनुदानाचे पैसे दिले तर शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असं राऊत (Nitin Raut) म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाच्या ऊर्जा खाते माझ्याकडे आहे, कधी कधी खटके उडत असतात, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पूर्ण माहिती नसते, म्हणून ऊर्जा खात्याचे चॅलेंजेस काय आहेत याची माहिती मुख्यमंत्री, नाना पटोले (Nana Patole) आणि वरिष्ठ नेत्यांना व्हावी म्हणून पत्र लिहिले आहे.

काही दिवसांपासून कोळशाची टंचाई (Coal scarcity) सुरू आहे, पैसे लागणारच यावर चर्चा व्हायला पाहिजे, नगरविकास व ग्रामविकास खात्याकडून निधी प्राप्त झाला नाही म्हणून वरिष्ठ नेत्यांना कळवणे आवश्यक होते. यंत्रमाग, कापड गिरण्या आहेत, विदर्भ, मराठवड्यातील सबसिडी मिळाली नाही, कर्ज मिळत नाही, राज्याकडून पैसे मिळत नाही, ही सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात दिलीय. यासंदर्भात मुख्यमंत्री आमच्याशी चर्चा करतील आणि योग्य निर्णय घेतील, असा विश्वास ही राऊत यांनी व्यक्त केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : इंजिनाचा वेग मंदावला! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

SCROLL FOR NEXT