प्राची कुलकर्णी
पुणे : गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिंदीवरील भोंगे (Mosque) उतरवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. भोंगे उतरवण्याच्या भूमिकेबाबत राज ठाकरे यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीकाही झाली. त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेत टीका करणाऱ्या नेत्यांचा ठाकेर यांनी समाचार घेतला. ३ मे पर्यंत मशिंदीवरील भोंगे उतरवावेच लागतील, नाहीतर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanuman chalisa) लावणार, असा अल्टीमेटम राज ठाकरे यांनी उत्तरसभेत दिला. त्यानंतर भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राजकीय वादंग सुरु झालं असून यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही भाष्य केले आहे. चव्हाण यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरुन थेट भाजपवर निशाणा साधलाय. भोंग्यांचा विषय हा भाजपचा ग्रँड प्लॅन आहे. भाजपच्यावतीने जाणूनबूजन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरु आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाचे पंतप्रधान आहेत की, मुख्यमंत्री आहेत हे पाहीलं पाहीजे. असा सवाल करत चव्हाण यांनी भाजपवर तोफ डागली आहे.
भाजपवर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, भाजपच्यावतीने जाणूनबूजन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरु आहे. संयम किती पाळायचा याला मर्यादा आहे. भाजपचं कमळ ऑपरेशन राज्यात उपयोगी ठरणार नाही. धार्मिक द्वेषाचं राजकारण सध्या सुरू आहे. अचानक लोकांना हनुमान आणि इतर गोष्टी आठवायला लागल्या आहेत. अशा शब्दांत चव्हाण यांनी भाजपवर खोचक टीका केलीय. तसंच राज्यातील सद्य परिस्थितीवरही त्यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात जे घडत आहे ते दोन्ही बाजूंनी घडतंय. राज्यात सुरु असलेल्या घडामोडींमुळे राज्यालाच नाही तर देशालाही याची हानी पोहोचत आहे. जातीयवाद राजकारण सुरु असल्याने त्याचा गुंतवणूकीवर परिणाम होत आहे. राजकीय लढाई ही घटनात्मक लढली पाहिजे. असं सांगत चव्हाण यांनी मुंबई काल झालेल्या राणा दाम्पत्याच्या नाट्यमय घडामोडींवरही भाष्य केलं.
कुणाच्याही गाडीवर हल्ला होणं हे चुकीचे आहे. राणा दाम्पत्य यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवली असल्यास पोलीस कारवाई करतील. फडणवीस यांना अखंड भारताचा कार्यक्रम राबवू द्या. आम्हाला जर कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तर आमच्या बुद्धीतही भर पडेल. १३५ वर्षात काँग्रेसने जी भूमिका घेतली आहे ती बदलणे शक्य नाही. असं म्हणत चव्हाण यांनी भाजपला टोला लगावला.
Edited By- Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.