''शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा राज्यतील काँग्रेस नेत्यांनी घ्यावा''
''शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा राज्यतील काँग्रेस नेत्यांनी घ्यावा'' राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

''शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा राज्यतील काँग्रेस नेत्यांनी घ्यावा''

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देशातील चाणाक्ष नेतृत्व आहे. पूर्वीचे ते काँग्रेसी होते. त्यामुळे राज्यातील काँग्रेसने शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन पक्ष वाढीस प्रयत्न करावा असा सल्ला माजी आमदार डी एन चौलकर यांनी काँग्रेसच्या नव्या नेतृत्वाला दिला आहे. राज्यात काँग्रेसला गतवैभव्य प्राप्त करून देण्यासाठी जुने जाणते जेष्ठ काँग्रेस नेते, कार्यकर्ते याच्याशी सल्लामसलत करावी असाही सल्ला चौलकर यांनी दिला आहे.

अलिबाग तुषार विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार डी एन चौलकर यांनी आपले मत स्पष्ट केले. सध्याच्या देशातील आणि काँग्रेस पक्षाच्या परिस्थितीबाबत माजी आमदार डी एन चौलकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार डी एन चौलकर हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले काँग्रेस कार्यकर्ते असून 1985 साली ते मालाड विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. 1980 साली त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी 39 हजार मताने त्याचा पराभव झाला होता. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले चौलकर 31 वर्ष राजकारणापासून अलिप्त होते. पण पुन्हा ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले आहेत.

काँग्रेस पक्षाला गांधी घरण्याशिवाय वाली नसून नवे नेतृत्व अद्यापही तयार झालेले नाही. काँग्रेस पक्ष हा गल्ली बोळात रुजलेला पक्ष आहे. मात्र सध्या काँग्रेसची वाताहत होताना दिसत आहे. शरद पवार हे राजकारणातील चाणाक्ष नेतृत्व असून राष्ट्रपती पदाची सूत्रे त्याच्या हातात द्यायला हवीत असे चौलकर याचे मत आहे. शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा काँग्रेस नेत्यांनी घेऊन त्यातून आपला पक्ष वाढवावा असे मत चौलकर यांनी पत्रकार परिषदेत मांडले. जुन्या, नव्या जेष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्याच्याशी सल्ला मसलत करून पक्ष वाढीसाठी नव्या अध्यक्षांनी प्रयत्न करावे असा सल्ला जेष्ठ काँग्रेस नेते माजी आमदार डी एन चौलकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ठाकरे गटाचे राजन विचारे आज लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार

T-20 WC 2024: मोठी बातमी! टी-२० वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Pune Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात शिंदवणेत दाेघांना अटक, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

High Blood Sugar : घाबरु नका! शरीरात सतत रक्तातील साखर वाढतेय? हे ४ उपाय लगेच करा

Sanjay Raut: 'वर्षा गायकवाड की नसीम खान', काँग्रेसने ठरवावं; संजय राऊत असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT