chandrapur, santoshsingh rawat,
chandrapur, santoshsingh rawat,  saam tv
महाराष्ट्र

Congress आक्रमक, जिल्हा बँक अध्यक्षांच्या गाेळीबारप्रकरणी मूल शहरात कडकडीत बंद; हल्लेखाेरांच्या अटकेची मागणी

संजय तुमराम

Chandrapur News : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत (santoshsingh rawat) यांच्यावर गुरुवारी रात्री मूल शहरात (mul city) प्राणघातक हल्ला झाला. या घटनेचे पडसाद आज (शुक्रवार) मूल शहरात उमटले. हल्लेखाेराेंना तातडीने अटक करा अशी मागणी करीत काँग्रेसने शहर बंदचे आवाहन केले आहे. (Maharashtra News)

गुरुवारी रात्री रावत हे बँकेच्या मूल शहरातील शाखेमधून दुचाकीवरून बाहेर पडले. बाहेर प्रतीक्षेत असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. रावत यांच्या दंडाला गाेळी चाटून गेल्याने ते या हल्ल्यातून बचावले.

चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या राजकीय नेत्यावर झालेला गोळीबार राजकीय वातावरण तापवून गेला. मूल शहरात आज (शुक्रवार) काँग्रेसने बंदचे आवाहन केले. शहरातील गांधी चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

रावत यांच्या हल्लेखोरांना 48 तासात अटक न झाल्यास जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने पाेलिस प्रशासनास दिला आहे. दरम्यान दुकाने- प्रतिष्ठाने बंद ठेवून मूल येथील व्यापारी व नागरिकांनी हल्ल्याचा निषेध नाेंदविला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपतींच्या गादीचा मान ठेवा म्हणता अन् साताऱ्यातून उमेदवार देता; नितेश राणे कुणावर संतापले?

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला झटका; 'जय भवानी' बाबतचा फेरविचार अर्ज फेटाळला

Hardik Pandya : T20 वर्ल्डकप आणि हार्दिक पंड्याबाबत 'सिक्सर किंग' युवराज सिंहचं मोठं वक्तव्य; रोहित-सूर्याचं नावही घेतलं नाही!

Bhuvan Bam: प्रसिद्ध युट्यूबर भुवनचं शाहरुखच्या पावलावर पाऊल; मुंबईत घेतलं नवकोरं घर

Side Effect Of Haldi Milk: हळदीचे दूध कोणी पिऊ नये?

SCROLL FOR NEXT