बुलढाण्यात लसीकरणाचा सावळा गोंधळ, मृत महिलेला कोरोना लस Saam Tv
महाराष्ट्र

बुलढाण्यात लसीकरणाचा सावळा गोंधळ, मृत महिलेला कोरोना लस

मागील काही दिवसात देशात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुलढाणा : मागील काही दिवसात देशात कोरोना विषाणूचा संसर्ग Corona नियंत्रणात आला आहे. पण भविष्यात संभाव्य कोरोना विषाणूच्या लाटेचा धोका लक्षात घेऊन देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण vaccination मोहीम राबवली जात आहे. अलीकडे देशात १०० कोटी लसी दिल्यामुळे मोदी सरकारने मोठा उत्सव साजरा केला होता, असे असताना बुलढाणातील एका मृत महिलेला लस दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हे देखील पहा-

संबंधित महिलेचा ७ महिन्याअगोदर मृत्यू झाला होता. असे असताना त्यांनी तामिळनाडूमध्ये लस घेतल्याचा मेसेज आलेला आहे. याबरोबर लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र देखील पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे मृत महिलेला लस दिल्याची ही पहिलीच घटना नाही. तर अशाप्रकारच्या अनेक घटना या अगोदर देखील समोर आले आहेत.

काही दिवसाअगोदर धुळे जिल्ह्यात शिंदखेडा या ठिकाणी राहत असलेले रहिवासी एका मृत व्यक्तीला लस दिल्याचा मेसेज पाठवण्यात आला होता. बन्सिलाल सुका धनराळे (वय-६६) असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या निधनानंतर ६ महिन्यांनी १९ ऑक्टोबर २०२१ दिवशी बन्सिलाल यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आला होता. यानंतर आता, सखूबाई गोपाळ बरडे या महिलेला लस दिल्याचा मेसेज आला आहे.पुणेकरांसाठी खुशखबर! डिसेंबर अखेर पीसीएमसी ते फुगेवाडी मेट्रो धावणार

७५ मृत सखूबाई बुलढाणा शहरामधील आढाव गल्लीत पती गोपाळराव आणि मुलगा राजेश यांच्या बरोबर राहत होते. १७ एप्रिल दिवशी त्याचे निधन झाले होते. सखूबाई यांचा मृत्यू होऊन ७ महिने झाल्यावर २ नोव्हेबर दिवशी गोपाळराव यांच्या मोबाइलवर एक मेसेज आला होता. यामध्ये सखूबाई यांनी कोरोना लसीचा डोस घेतल्याचे सांगण्यात आले होते. संबंधित मेसेजमधील लिंकवर क्लिक केले असता, लसीकरणाचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

VIDEO : हाँगकाँगमध्ये मोठी दुर्घटना! लँडिंगवेळी कंट्रोल सुटलं, कार्गो विमान थेट समुद्रात कोसळलं, दोघांचा मृत्यू

दिवाळी गोड! मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 1 हजार 566 कोटींचा निधी|VIDEO

PMC Bonus: पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस जाहीर

Success Story: इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय ते बिझनेसमॅन, बीडच्या लेकाने उभारली स्वतःची कंपनी; Canvaला देतेय टक्कर

SCROLL FOR NEXT