Amravati: अमरावती महापालिकेच्या आमसभेत राडा...(पहा Video) Saam Tv
महाराष्ट्र

Amravati: अमरावती महापालिकेच्या आमसभेत राडा...(पहा Video)

सभागृहाच्या पवित्र ठिकाणी अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती : बसपाचे नगरसेवक चेतन पवार (Chetan Pawar) व एमआयएमचे नगरसेवक अब्दुल नाझीम (Abdul Nazim) यांच्या एका प्रश्नाला उत्तरमध्ये बाचाबाची झाली आहे. त्यानंतर एमआयचे नगरसेवक अब्दुल नाझीम हे सभागृहामध्ये असे अपशब्द का बोलला यावरून बसपचे नगरसेवक (Corporator) चेतन पवार यांच्या अंगावर धाऊन गेले आहे. यामुळे एकच गोंधळ (Confusion) पालिकेत (Municipal Corporation) उडाला होता. हे सर्व गोंधळ सुरू असताना महापौर चेतन गावंडे आणि आयुक्त प्रवीण आष्टीकर (Praveen Ashtikar) यांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले आहे. (Confusion general meeting Amravati Municipal Corporation)

पहा व्हिडिओ-

हा गोंधळ बराच वेळ चालत होता. या दरम्यान सभागृहाच्या पवित्र ठिकाणी अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे, असा आरोप करण्यात आला. अमरावती महापालिकेची आजची ही शेवटची सभा आहे. यामुळे या सभेत मोठा गोंधळ उडला आहे. अमरावतीच्या महापालिकेच्या सर्वसाधारण आणि शेवटच्या सभेत गोंधळ प्रभाग रचनेवरून बसपच्या आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी दोघेही एकामेकाच्या अंगावर गेले काही वेळेसाठी सभागृह तहकूब करण्यात आली होती.

हे देखील पहा-

साफसफाई कंत्राटवरून हा वाद सुरु झाला आहे. सुरुवातीला भाजपचे नगरसेवक गटनेते तुषार भारतीय सभागृहाचे विरोधी पक्ष नेते बबलू शेखावत यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यानंतर एमआयएमचे अब्दुल नाझीम अब्दुल रौझ आणि बीएसपीचे चेतन पवार यांच्यात तुफान राडा झाल्याचा पाहायला मिळाले आहे. चेतन पवार यांनी अपशब्द वापरल्याच्या कारणावरून एमआयएमचे नगरसेवक अब्दुल नाझीम अब्दुल रौझ हे पवार यांच्या अंगावर धावून गेले आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा महानगरपालिकाने उभारावा. वेळ पडल्यास खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची मदत घ्या, अशी मागणी बसपाचे नगरसेवक चेतन पवार यांनी यावेळी केली आहे.

काँग्रेसविरुद्ध भाजप असा वाद देखील यावेळी बघायला मिळाला आहे. कचऱ्याच्या कंत्राटदारावरून वाद झाला आहे. यामुळे ज्येष्ठ नगरसेवकांनी यावेळी नाराजी व्यक्त केल्याचे नगरसेवक विलास इंगोले यांनी यावेळी सांगितले आहे. कोरोना काळामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची वेळोवेळी स्तुती केली आहे. परंतु, प्रभार रचना बदलल्याने चर्चेतून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यावेळी महापौर चेतन गावंडे आणि आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे सभागृहाबाहेर निघून गेले आहेत. त्यानंतर 10 मिनीटं आमसभा ही तहकूब करण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT