नाशिक - रहिवासी सोसायट्यांना आता इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सक्ती करण्यात आली आहे. नाशिक महापालिका आयुक्तांनी या संदर्भातील आदेश काढले असून अशा प्रकारचा पर्यावरणस्नेही निर्णय घेणारी नाशिक महापालिका पहिली महापालिका ठरली आहे. नाशिककरांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण सध्या वाढत्या इंधन दराने सगळेच हैराण झाले आहेत. सामान्य नागरिकांना वाहनं वापरणंही आता परवडेनासं होत चाललं आहे. यावर इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध झाला असला, तरी चार्जिंग स्टेशन अभावी अद्याप इलेक्ट्रिक वाहनं वापरण्यावर मर्यादा आहेत.
हे देखील पहा -
ही बाब लक्षात घेता तसंच काळाची पावले ओळखून आता नाशिक महापालिकेने रहिवासी सोसायट्यांना इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सक्ती केली आहे. या निर्णयानुसार प्रत्येक मोठ्या गृहनिर्माण संस्थांचे बांधकाम प्रस्ताव सादर करताना त्यात चार्जिंग स्टेशनची तरतूद आहे की नाही, हे तपासलं जातं आहे. चार्जिंग स्टेशनची सोय नसल्यास त्या गृहनिर्माण प्रकल्पाला परवानगी मिळणार नाही.
विशेष म्हणजे सध्या केंद्र सरकार क्लीन एअर मिशन राबवतय. त्यात महापालिकेचाही समावेश असून येणाऱ्या काळात कोणतही नवीन वाहन खरेदी करताना महापालिका इलेक्ट्रिकल अथवा सीएनजी वाहन खरेदी करणारय. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रदूषणालाही आळा बसण्यास मदत होणार आहे.विशेष म्हणजे असा पर्यावरणस्नेही निर्णय घेणारी ही राज्यातली पहिलीच महापालिका ठरली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.