चेकअपचे निमित्त करून कंपाउंडरने केला महिलेचा विनयभंग; आरोपी फरार Saam TV
महाराष्ट्र

चेकअपचे निमित्त करून कंपाउंडरने केला महिलेचा विनयभंग; आरोपी फरार

अडीच वाजण्याच्या दरम्यान आरोपी वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक क्षीरसागर

लातूर जिल्ह्यातील (Latur District) उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होऊन प्रसूती झालेल्या एका 21 वर्षीय महिलेचा रुग्णालयातील कंपाउंडरने चेकअपचे निमित्त करून ओपीडीमध्ये नेऊन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात कंपाउंडर वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील महिलेची प्रसूती झाली होती. दरम्यान या रुग्णालयातील कंपाउंडर आरोपी सचिन राजमाने याने प्रसूत झालेल्या महिलेला चेकअप करण्याच्या निमित्ताने रुग्णालयातील ओपीडी रूममध्ये नेऊन या महिलेचा विनयभंग केला दुध येते का नाही म्हणून वाईट हेतूने स्पर्श केला अशा आशयाची फिर्याद सायंकाळी पीडित महिलेने दिल्यावरून शहर पोलीस ठाण्यात रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान आरोपी वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. रात्री अडीच वाजता गुन्हा दाखल करून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी फरार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी कारवाई; ४ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

Maharashtra Live News Update: शिरोळच्या आमदारांच्या घोडावत खांडसरीवर शेतकऱ्यांचे आंदोलन

दिवाळीत लेकरांना कपडे घ्यायला पैसे नव्हते; नैराश्यग्रस्त शेतकरी बापाने आयुष्य संपवलं, पाहा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

'माझे प्रायव्हेट व्हिडिओ..' गर्लफ्रेंडकडून UPSCच्या विद्यार्थ्याची हत्या; Ex-बॉयफ्रेंड सिलिंडरवाल्याची मदत घेऊन काटा काढला

विवाहातील समस्या दूर करण्यासाठी तुळशीच्या लग्नाला करा 'हे' ५ सोपे उपाय, त्वरित होईल विवाह

SCROLL FOR NEXT