complusion of cibil to farmers for crop loan  Saam Digital
महाराष्ट्र

Cibil Score ठरताेय पीक कर्जासाठी अडथळा, सक्ती हटवा; शेतक-यांची मागणी

cibil score compulsory for crop loan : अमरावती जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ९ मे २०२३ च्या जिल्हा बैठकीत बँकांना सिबील बाबतचे निर्देश दिले होते.

Siddharth Latkar

- अमर घटारे

राष्ट्रीयीकृत बँकां पुन्हा एकदा पीक कर्जासाठी सिबील स्कोअर पाहत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतक-यांमध्ये पुन्हा एकदा चितेंचे वातावरण पसरले आहे. गतवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना सिबीलमधून मुक्तता दिली हाेती. आता पुन्हा सिबीलची सक्ती झाल्यास काय असा प्रश्न शेतक-यांसमाेर उभा राहिला आहे.

गतवर्षीच्या हंगामापूर्वीच राज्यस्तरीय बैंकर्स समितीचा (एसएलबीसी) निर्णय झाल्यानंतर सर्व बँकांना सिबीलची सक्ती नकाे असे कळविण्यात आले होते. त्याशिवाय अमरावती जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ९ मे २०२३ च्या जिल्हा बैठकीत बँकांना सिबील बाबतचे निर्देश दिले होते.

त्यामुळे या प्रकाराला काही प्रमाणात पायबंद बसला हाेता. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी पीक कर्जाची मागणी करु लागलेत. यावेळी बँकांद्वारा शेतकऱ्यांचे सिबील स्कोअर तपासण्यात येत असल्याचे चित्र आहे. यामध्ये 650 पेक्षा स्काेअर कमी असल्यास बँका कर्ज नाकारत असल्याचा आरोप शेतकरी करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंदखेडराजा तालुक्यात तुफानी पाऊस नदी नाल्यांना पूर

लोणावळ्यातील भुशी डॅमवर तरूणाचा किळसवाणा प्रकार; व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार; CM फडणवीसांनी दिलं मोठं आश्वासन| VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट

Sant Dnyaneshwar Maharaj: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी भक्ताकडून चांदीची राखी अर्पण

SCROLL FOR NEXT