Akola , Garba , Dandiya Rass , Police  Saam Tv
महाराष्ट्र

Garba : गरबा खेळणा-या महिलांचे काढले २५० फोटो; चाैघे अटकेत

चारही जणांच्या मोबाईलची तपासणी पोलिसांनी केली.

जयेश गावंडे

Dandiya Rass : गरबा (garba) व दांडीया खेळण्यासाठी आलेल्या महिलांचे छायाचित्र काढल्याचा प्रकार अकाेला येथे समाेर आला आहे. या प्रकरणी मंडळाच्या पदाधिका-यांनी चाैघांना पकडलं आहे. संबंधितांची पाेलीस (police) कसून चाैकशी करीत आहेत. अटकेत असलेले हे चाैघे परप्रांतीय असल्याची माहिती पाेलीसांनी दिली. (akola latest marathi news)

अकोल्यातील रिगल टॉकीज परिसरातील राम नगर नवदुर्गा उत्सव मंडळाच्या देवीजवळ पुजेसाठी गरबा व दांडीया खेळण्यासाठी आलेल्या महिलांचे उत्तर प्रदेशातून आलेल्या चार जणांनी छायाचित्र काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ उडाली. याबाबत सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राम नगर नवदुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या चारही जणांना छायाचित्र काढताना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्या मोबाइलमध्ये २५० पेक्षा अधिक महिलांचे छायाचित्र असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

उत्तर प्रदेशातील चार जण छताच्या 'पीओपी'चे कारागीर आहे. ते राम नगर परिसरातील एका व्यावसायिकाच्या छताच्या 'पीओपी'चे मंगळवारी काम करीत असतानाच महिला व युवतींचे छायाचित्र काढत असल्याचे परिसरातील काही युवकांच्या लक्षात आले. याच दरम्यान ते राम नगर नवदुर्गोत्सव मंडळामध्ये येणाऱ्या महिलांचे छायाचित्र काढत असल्याचा संशय शिवसैनीक सागर भारुका यांना आला. त्यांनी चारही जणांचे मोबाईल घेउन थेट सिटी कोतवाली पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: ICU मध्ये बेड नाही, स्ट्रेचरवरच उपचार; कूपर रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये उन्हाचा चटका वाढताच रस्त्यावर शुकशुकाट

BJP: माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, तेव्हाच पद मिळेल; महिला पदाधिकाऱ्याचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली, वाटेत दोघांनी अडवलं; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार

Auto Driver Marathi language : हिंदीसक्तीचा बदला घेण्यासाठी शिंदेसेनेची मराठीसक्ती? EXPLAINER

SCROLL FOR NEXT